वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गौतम अदानी यांची कंपनी अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड (एडीएनएल) ला टेलिकॉम क्षेत्रात प्रवेशयोग्यता सेवांसाठी युनिफाइड लायसेन्स देण्यात आले आहे. या लायसनेन्सद्वारे ही कंपनी देशात सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा देऊ शकते. त्यामुळे अदानी आता अंबानींची जिओ आणि एअरटेल या कंपन्यांना 5 सेवेत टक्कर देईल. Unified license to Adani in telecom sector; It will compete with Jio, Airtel and other companies
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांची कंपनी अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड (एडीएनएल) ला प्रवेशयोग्यता सेवांसाठी युनिफाइड लायसेन्स देण्यात आले आहे. त्यामुळे अदानी कंपनी देशात सर्व प्रकारच्या टेलिकॉम सेवा देऊ शकते. हे युनिफाइड लायसेन्स १० ऑक्टोबरला जारी करण्यात आल्याची माहिती असून आंध्र, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक आणि मुंबई या 6 सर्कलमध्ये कंपनीला त्याद्वारे सेवा देता येईल. मात्र, या संदर्भात अदानी समूहाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
देशात अलिकडेच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर अदानी समूहाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. या स्पेक्ट्रमचा वापर समूहातील व्यावसायिक उपक्रमांसाठी करणार असल्याचे, कंपनीने सांगितले होते. एडीएनएल ने नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात ४०० MHz स्पेक्ट्रम २० वर्षांसाठी २१२ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
जीओ, एअरटेल कंपन्यांसमोर आव्हान
युनिफाइड परवाना मिळाल्यानंतर, कंपनी भविष्यात तिच्या 5G सेवांचा विस्तार करू शकते. अदानीच्या प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया व्यतिरिक्त जीओ, एअरटेल यांसारख्या कंपन्यांसमोर नवीन आव्हान असेल. अदानी समूहाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करताना सांगितले होते की, ते त्यांच्या डेटा केंद्रांसह त्यांच्या सुपर अॅप्ससाठी एअरवेव्ह वापरण्याची योजना करत आहेत. हे वीज वितरणापासून विमानतळ आणि बंदरांपर्यंत गॅसच्या किरकोळ विक्रीला समर्थन देईल.
अलिकडच्या काळात अदानी समूहाने पेट्रोकेमिकल क्षेत्रात प्रवेश केला असताना रिलायन्स समूहानेही हरित ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला आहे. आता टेलिकॉम क्षेत्रात अदानी समूहाच्या प्रवेशाने ही या दोघांमधील पहिली थेट स्पर्धा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App