वृत्तसंस्था
मॉस्को : मार्क झुकरबर्ग यांचा सोशल मीडिया जाएंट Meta मेटा रशियात दहशतवादी म्हणून जाहीर झाला आहे रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियातील व्लादिमीर पुतीन सरकारने Meta वर नुसती बंदी घालण्याचे नव्हे, तर त्याला दहशतवादी घोषित करण्याचे पाऊल उचलले आहे. Mark Zuckerberg’s social media giant Meta has been declared a terrorist organization in Russia
याआधी रशियामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम, आणि ट्विटर यांना ब्लॉक केले आहे. या सर्व पाश्चात्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून युक्रेनमधील यूजर्सना रशिया विरुद्ध हिंसाचाराची छावणी देत असल्याचा आरोप रशियन सरकारने केला असून हे सर्व प्लॅटफॉर्म रशियात ब्लॉक करण्यात आले आहेत.
मेटाच्या वकिलांनी रशियन सरकारने लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मेटाने कधीही दहशतवादाला अथवा अतिरेकाला प्रोत्साहन दिलेले नाही. त्याचबरोबर मेटा रशियाफोबिकही नाही, असा दावा या वकिलांनी केला आहे.
रशिया – युक्रेन युद्धाला आठ महिने उलटून गेले आहेत. युक्रेनने काही पूल पाडल्यानंतर रशियाने युक्रेन वरचे हल्ले वाढवले आहेत. या पार्श्वभूमीवर मेटा सारख्या सोशल मीडिया जाएंटला ब्लॉक करणे आणि त्याला दहशतवादी घोषित करणे हे पाऊल रशियन सरकारने उचलले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App