बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल तलवार चिन्ह; चिन्हाचा वार तात्पुरता मिटला

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या दोन्ही शिवसेनेच्या चिन्हांचा वाद तात्पुरता मिटला असून बाळासाहेबांच्या शिवसेनेला अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ढाल तलवार हे चिन्ह बहाल केले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्हवर, तर बाळासाहेबांची शिवसेना ढाल तलवार चिन्हावर लढवणार आहेत. Balasaheb’s Shiv Sena shield and sword symbol; The mark’s blow was temporarily extinguished

बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाने निव डणूक आयोगाकडे दोन ईमेल करून सहा चिन्हांची शिफारस केली होती. यामध्ये तळपता सूर्य आणि रिक्षाचाही समावेश होता. मात्र निवडणूक आयोगाने त्यांनीच मागितलेल्या ढाल तलवार चिन्हाला मान्यता देऊन शिंदे गटाला अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल तलवार हे चिन्ह मंजूर केले आहे.

अर्थात शिवसेनेच्या या चिन्हाचा वाद तात्पुरता मिटला असून बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने शिवसेनेचे मूळ निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावरचा दावा सोडलेला नाही. तो दावा त्यांनी कायम ठेवला असून यासंदर्भातली लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत नेण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची तयारी आहे. मात्र अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सध्या सुरू आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे पक्षाने मशाल या चिन्हावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. परंतु त्या पोटनिवडणुकीत भाजप ने मुरजी पटेल या माजी नगरसेवकांना उतरवले आहे. ते भाजप – बाळासाहेबांची शिवसेना या युतीचे उमेदवार म्हणून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ढाल तलवार या चिन्हाचा वापर होण्याची शक्यता नाही.

Balasaheb’s Shiv Sena shield and sword symbol; The mark’s blow was temporarily extinguished

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात