बाळासाहेबांच्या शिवसेनेची चलाखी : मशाली विरुद्ध तळपता सूर्य, नाहीतर मर्सिडीज विरुद्ध रिक्षा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटातून आणि काही लिबरल्स कडून “जितं मया”च्या घोषणा देण्यात येत असल्या तरी त्यापुढे जात शिंदे गटाने म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेने एक नवी चलाख चाल खेळली आहे, ती म्हणजे आपल्या पक्षासाठी निवडणूक आयोगाला नवी चिन्हे सुचवताना त्यांनी 3 पर्याय नव्हे, तर 6 पर्याय दिले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने मशाली विरुद्ध तळपता सूर्य त्याचबरोबर मर्सिडीज समोर रिक्षा अशा स्वरूपाची चिन्हे आहेत. Balasaheb’s Shiv Sena’s cleverness: Mashali vs Talpata Surya, or Mercedes vs Rickshaw

अर्थात दुसऱ्या चिन्हाच्या मध्ये फक्त रिक्षाचा उल्लेख आहे पण त्याचा राजकीय संदर्भ फार मोठा आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख रिक्षावाला असा अपमानास्पदरित्या केला होता. त्या अपमानाला विधानसभेत उत्तर देताना आमच्या रिक्षेने तुमच्या मर्सिडीजला हरवले असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले होते. शिवाय होय, मी आहेच रिक्षावाला.


Eknath Shinde Vs Sanjay Raut : एकनाथ शिंदे म्हणाले- दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्यांना शिवसेना पाठीशी कशी घालणार?


सर्वसामान्य माणूस छोटे-मोठे व्यवसाय करूनच पोट भरतो. तसे मी पोट भरले आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय केला आहे, असे उत्तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिले होते. एकनाथ शिंदेंच्या या उत्तराची प्रचंड क्रेझ काहीच दिवसांपूर्वी ठाण्यासह महाराष्ट्रात पसरल्यानंतर ठाण्यातल्या रिक्षावाल्यांनी “मी एकनाथ शिंदे मी मुख्यमंत्री” असे टी-शर्ट छापून घेतले होते.

त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या गटाने अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपल्या चिन्हाच्या पर्यायांमध्ये आवर्जून रिक्षा या चिन्हाचा समावेश केलेल्या दिसतो आहे. शिंदे गटाचे आमदार अनेकदा आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मर्सिडीज बेबी असा करतात. या पार्श्वभूमीवर देखील शिंदेंनी पर्याय म्हणून सुचवलेले रिक्षा चिन्ह त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

निवडणूक आयोगाने तळपता सूर्य किंवा रिक्षा या दोन्हीपैकी कोणतेही चिन्ह मान्य केले तरी शिंदे गटाच्या म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या दृष्टीने ठाकरे गटाला म्हणजेच शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला खऱ्या अर्थाने मोठा पर्याय दिल्याचे स्पष्ट होईल.

Balasaheb’s Shiv Sena’s cleverness: Mashali vs Talpata Surya, or Mercedes vs Rickshaw

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात