Mahakal Lok Photos : महाकाल लोकच्या कॉरिडॉरमध्ये हजारो वर्षांचा इतिहास, कारंजे आणि 50 हून अधिक भित्तीचित्रे, अशी आहे वैशिष्ट्ये

विशेष प्रतिनिधी 

आज पंतप्रधान मोदी महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करतील. ‘महाकाल लोक’ची भव्यता आणि सौंदर्य शिवभक्तांना भुरळ घालणार हे निश्चित. Mahakal Lok Photos The corridors of Mahakal Lok feature thousands of years of history, fountains and over 50 murals

मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या ‘महाकाल लोक’मध्ये भव्य प्रवेशद्वार, कारंजे यासह शिवपुराणातील कथांचे वर्णन करणाऱ्या ५० हून अधिक चित्रांची मालिका तयार करण्यात आली आहे. उज्जैनमध्ये बांधण्यात आलेला 900 मीटरपेक्षा जास्त लांबीचा महाकाल कॉरिडॉर हा भारतात बांधण्यात आलेल्या अशा सर्वात मोठ्या कॉरिडॉरपैकी एक आहे.

सुमारे साडेतीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर महाकाल लोकच्या प्रत्येक कोपऱ्यात दगड कोरून महाकालचा असा भव्य संकुल तयार करण्यात आला आहे, जिथे भक्तांची नजर खिळून राहील. येथे शिव, शक्ती आणि धार्मिक कार्यक्रमांशी संबंधित सुमारे 200 मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.

महाकाल कॉरिडॉरचे बांधकाम 2019 मध्ये सुरू झाले. दोन हेक्टरमध्ये बांधलेल्या मंदिर संकुलासाठी सुमारे 750 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. येथे भगवान शिवाशिवाय भैरव, गणेशजी, माता पार्वती आदी देवतांच्या 200 मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. एकूण खर्चापैकी मंदिर समिती 21 कोटी रुपये खर्च करणार आहे.

महाकाल कॉरिडॉरचे बांधकाम उज्जैन या ऐतिहासिक शहराच्या प्राचीन वैभवावर जोर देण्यासाठी आहे. यामुळेच मंदिराच्या बांधकामात प्राचीन वास्तूचा वापर करण्यात आला असून, तेथे लोकांना सर्व अत्याधुनिक सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. धार्मिक महत्त्वाच्या अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे.

महाकाल लोकार्पण सोहळ्याबद्दल शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सर्वांना हा ऐतिहासिक क्षण पाहण्याची विनंती केली होती. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 350 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

संपूर्ण परिसर फिरायला 5-6 तास लागतील, पण या काळात हजारो वर्षांचा धार्मिक इतिहास जिवंत होईल. येथे शिवपुराणातून घेतलेल्या कथा भिंतीवर कोरल्या आहेत. भोलेनाथाचा विवाह कोरीव पाषणांच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. शिवविवाहाचे दगडी भित्तीचित्र देशातील सर्वात मोठे 132 फूट लांबीचे आणि 6 फूट रुंदीचे आहे.

पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता त्याचे उद्घाटन करणार आहेत. हा कॉरिडॉर जुन्या रुद्रसागर तलावाजवळ आहे, जो प्राचीन महाकालेश्वर मंदिराभोवती पुनर्विकास प्रकल्पाचा भाग म्हणून पुनरुज्जीवित झाला आहे.

Mahakal Lok Photos The corridors of Mahakal Lok feature thousands of years of history, fountains and over 50 murals

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात