प्रतिनिधी
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना येथील विशेष न्यायालयाने सोमवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात कोरोनरी अँजिओग्राफी करण्याची परवानगी दिली. देशमुख (71) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती आणि नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे. मात्र, केंद्रीय तपास यंत्रणेने हायकोर्टाच्या जामीन आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.Court relief to Anil Deshmukh Angiography allowed in private hospital, treatment in Jaslok
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची सीबीआयमार्फत चौकशी सुरू असून ते वेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी आहेत. देशमुख यांनीही भ्रष्टाचार प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला असून विशेष न्यायालयाने सीबीआयला १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनिल देशमुख यांनी अॅड. अनिकेत निकम आणि इंदरपालसिंग यांच्यामार्फत विशेष न्यायालयाकडे याचिका दाखल करून जसलोक या खासगी रुग्णालयात अँजिओग्राफी करण्याबाबत परवानगी मागितली होती.
हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात काही अडथळे आहेत का, हे पाहण्यासाठी सामान्यतः चाचणी केली जाते. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची याचिका मान्य केली. विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी यासंदर्भात आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांना देशमुख यांना जसलोक रुग्णालयात भरती करून अँजिओग्राफीसह पुढील उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी देशमुख यांनीच खर्च करावा, असे सूचित केले. आरोपींना आवश्यकतेनुसार पोलिस घेऊन जातील आणि त्यासाठी लागणारा खर्चही देशमुख उचलतील, असे न्यायालयाने सांगितले.
मनी लाँड्रिंग प्रकरणात झाली होती अटक
अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी त्यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. त्यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात खंडणी वसुलीच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर ईडीनेही देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विविध बारकडून 4.70 कोटी उकळल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App