प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या केजरीवाल मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी विजयादशमीच्या एका कार्यक्रमात सामील होत स्थानिक लोकांना ब्रह्मा विष्णू महेश रामकृष्ण या हिंदू दैवतांची पूजा न करण्याची शपथ दिली. Kejriwal’s minister vows not to worship Ram-Krishna
दिल्ली भाजपच्या नेत्यांनी या संदर्भात एक व्हिडिओ जारी केला असून त्यामध्ये हजारो लोक हिंदू देवदेवतांना ईश्वर मानणार नसल्याची शपथ घेताना दिसत आहेत. दिल्लीचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनीही शपथ दिल्याचा भाजपने त्यांचा आरोप आहे. हा व्हिडिओ जय भीम मिशन अंतर्गत दिल्लीतल्या करोल बाग मधील कार्यक्रमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
https://twitter.com/NiteshT59688380/status/1578246948611854336?s=20&t=lywMWFr-s0fxHs14arzbyQ
राजेंद्र पाल गौतम यांनी या बाबत एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात : ”चलो बुद्ध की ओर मिशन जय भीम बुलाता है। आज “मिशन जय भीम” के तत्वाधान में अशोका विजयदशमी पर डॉ. अंबेडकर भवन रानी झांसी रोड पर 10,000 से ज्यादा बुद्धिजीवियों ने तथागत गौतम बुद्ध के धम्म में घर वापसी कर जाति विहीन व छुआछूत मुक्त भारत बनाने की शपथ ली। नमो बुद्धाय, जय भीम!”
यासंदर्भातील व्हिडिओ जारी करून दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना काही प्रश्न विचारले आहेत. आम आदमी पार्टीचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. केजरीवाल्यांचे एक मंत्रीच ब्रह्मा, विष्णू, महेश, राम, कृष्ण यांची पूजा करू नका, अशी शपथ देत आहेत.
पण निवडणुकीच्या काळात मंदिरांमध्ये जाऊन दर्शने घ्यायची नाटके का केली? हिंदू धर्म तुम्हाला एवढा का टोचतो? हिंदू धर्माविषयी तुमचा एवढा द्वेष का?, असा सवाल भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केला आहे. भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी देखील या व्हिडिओवरूनच केजरीवालांना अशाच आशयाचे प्रश्न विचारले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App