हिंदू हेट स्पीच देणाऱ्या फादर जॉर्ज पोन्नैया यांच्याकडून राहुलजींनी समजावून घेतला येशू ख्रिस्त देव!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत तामिळनाडूमध्ये आहेत. कन्याकुमारी पासून सुरू केलेली यात्रा तामिळनाडूतील विविध राज्यांमध्ये जात आहे. राहुल गांधी या यात्रेच्या निमित्ताने अनेक लोकांना भेटत आहे. त्यांनी या यात्रेत कन्याकुमारीतील चर्चला भेट दिली. यावेळी तेथील कॅथोलिक फादर जॉर्ज पोन्नैया यांच्याकडून त्यांनी येशू ख्रिस्त देव समजावून घेतला आहे. Rahulji understood Jesus Christ God from Father George Ponnaiah who gave Hindu hate speech

हेच ते फादर जॉर्ज पोन्नैया आहेत, ज्यांना 2021 मध्ये हिंदू विरुद्ध हेट स्पीच दिल्याबद्दल तामिळनाडू पोलिसांनी अटक केली होती. फादर जॉर्ज पोन्नैया हे वादग्रस्त ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच तामिळनाडूतल्या द्रमूक सरकार मधल्या मंत्र्यांविरुद्ध देखील हेट स्पीच दिली आहेत.

या फादर जॉर्ज पोन्नैया यांनी राहुल गांधींना येशू ख्रिस्त हा कसा खरा देव आहे हे समजावून सांगितले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये राहुल गांधी येशू ख्रिस्ता विषयी माहिती विचाताना येशू ख्रिस्त हे देवतेचे एकरूप होते का?, असा प्रश्न विचारताना दिसतात. त्यावर फादर पोन्नैया हे येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र किंबहुना जिताजागता देवच होता. तो एखादी शक्ती (हिंदू शक्तीस्वरूप देवता) नव्हता. तो प्रत्यक्ष हाडा मांसाचा देव होता. तो आपल्यात वावरत होता, असे समजावून सांगत आहेत.

 फादर जॉर्ज पोन्नैया यांचे ट्रॅक रेकॉर्ड

या फादर जॉर्ज पोन्नैया यांचे ट्रॅक रेकॉर्ड हिंदू विरोधी आहे. त्यांना 18 जुलै 2022 रोजी हिंदू विरोधी हेट स्पीच दिले होते. त्याबद्दल त्यांना तामिळनाडू पोलिसांनी 24 जुलैला अटक देखील केली होती.

इतकेच नाही तर फादर पुणे या यांनी अर्बन नक्षलवादी स्टेन स्वामी यांच्या विषयी सहानुभूती दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्याचबरोबर कोरोना लॉकडाऊन दरम्यान चर्च मधील सामुदायिक प्रार्थना बंद करण्याला देखील विरोध केला होता. त्यांनी हिंदू आणि नाडर समाजाचा अपमान केला होता, इतकेच नाही तर तामिळनाडूच्या द्रमुक सरकारमधील हिंदू धार्मिक आणि धर्मार्थ व्यवहार मंत्री पी. के. शेखर बाबू यांच्या बद्दल अपमानास्पद उद्गार काढले होते. ते म्हणाले होते, की तुम्ही किती हिंदू मंदिरांमध्ये जाऊन अभिषेक करता किंवा त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करता याला काही महत्त्व नाही.

मंडईकट्टू देवाचा कोणीही भक्त तुम्हाला मत देणार नाही. तुम्ही जिंकलात तर ते तुमच्या व्यक्तिगत प्रतिभेमुळे नव्हे, तर ख्रिश्चन आणि मुसलमानांनी दिलेल्या मतांच्या भिकेतून तुम्ही जिंकलेले असाल, अशा शब्दांमध्ये त्यांनी शेखर बाबू यांचा अपमान केला होता. चर्चच्या आदेशानुसार ख्रिश्चन कार्यकर्त्यांनी प्रचार केल्यामुळे काँग्रेस आणि प्रमुख जिंकले याची आठवण त्यांनी करून दिली होती.

अशा फादर जॉर्ज पोन्नैया यांच्याकडून राहुल गांधी यांनी येशू ख्रिस्त देव समजून घेतला आहे. त्यासाठी भारत जोडो यात्रा हे निमित्त ठरले आहे.

Rahulji understood Jesus Christ God from Father George Ponnaiah who gave Hindu hate speech

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात