
प्रतिनिधी
मुंबई : लालबागचा राजा, जीएसबी या मुंबईतील तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, कसबा गणपती, गुरुजी तालीम या गणपतींच्या दर्शनासाठी यंदा मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी दानपेटीत 5 ते 10 कोटींचे विक्रमी दान पडल्याचा अंदाज मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लालबागच्या राजाच्या दानपेटीत पहिल्या चार दिवसांतच दीड कोटी दान जमा झाले होते.5.1 Crores Donation to Raja of Lalbagh 3 Kg Gold, 40 Kg Silver, 3.35 Crores in Cash
कोरोनापूर्व काळात लालबागच्या राजाच्या दानपेटीत १० दिवसांत ७ कोटी, तर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दानपेटीत ३ कोटी रुपयांचे दान संकलित होत असे.
लालबागच्या राजाच्या दानपेटीत यंदा मंगळवारपर्यंत ३ किलो सोने, ४० किलो चांदी आणि ३.३५ कोटी रोकड अशी एकूण ५.१ कोटींचे दान जमा झाले होते. दहा दिवसांत हा आकडा १० कोटींच्या घरात गेल्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये राजाच्या दानपेटीत ८ कोटींचे दान पडले होते. त्यात साडेपाच किलो सोने, ७५ किलो चांदी होती. यंदा पहिल्या ४ दिवसांतच एवढे दान जमा झाले आहे.
यापूर्वी २००८ मध्ये लालबागच्या राजाच्या ७५ व्या वर्धापनदिनी सर्वाधिक म्हणजे ११.५ कोटींचे दान आले होते. यंदा हा आकडाही पुढे जाण्याची शक्यता आहे. निर्बंध हटल्यानंतरचा भक्तांच्या उत्साहाचा व भक्तीचा महापूर बघता गणेश मंंडळांच्या दानपेटीतील भक्तांचे दान व देणग्याही यंदा विक्रमी उंची गाठण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी यंदा राजकीय नेते, अभिनेते यांनीही मोठी गर्दी केली होती.
5.1 Crores Donation to Raja of Lalbagh 3 Kg Gold, 40 Kg Silver, 3.35 Crores in Cash
महत्वाच्या बातम्या
- इंटरनेट कॉलचे नियमन : आता व्हिडिओ कॉलसाठी मोजावे लागणार पैसे??
- राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन, पुढील दहा दिवस अंत्यसंस्कार होणार नाहीत, टॉप 10 मुद्दे
- मुंबई, ठाणे, नाशकात पावसाचा धुमाकूळ; लाडक्या गणरायाला निरोप देताना भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन
- 26000 तासांची मेहनत, 28 फुटी प्रतिमा; राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण !