वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज भाजपची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी कठीण समजल्या जाणाऱ्या 144 लोकसभा जागांवर प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा केली. दुपारी साडेचार वाजता बैठक सुरू झाली.BJP meeting on 2024 Lok Sabha elections Ministers present report on 144 seats where party lost in 2019, brainstorm on strategy
या बैठकीला 25 केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यात भूपेंद्र यादव, गिरीराज सिंह, स्मृती इराणी, पुरुषोत्तम रुपाला, गजेंद्र सिंह शेखावत हे प्रमुख आहेत.
मंत्र्यांनी सादर केला अहवाल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांनी त्यांना नेमून दिलेल्या 3 ते 4 लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्यात आला. येथे पक्षाला बूथ स्तरावर आपली उपस्थिती वाढवायची आहे. तसेच विविध समुदायांमध्ये आपली पोहोच वाढवायची आहे. या मिशनमध्ये पक्षाची नजर विशेषत: अशा लोकांवर आहे ज्यांना विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळत आहे.
या मार्गावर काम करत राहणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. यासोबतच पक्षनेतृत्वाने दिलेल्या सूचनांचे पालनही ते करणार आहेत.
बैठक खूप महत्त्वाची
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारी सुरू होत असताना ही बैठक महत्त्वाची ठरते. दुसरीकडे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या बैठकीत भाजपने त्या 144 लोकसभा जागांसाठी रणनीती ठरवली, ज्यावर गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा फार कमी फरकाने पराभव झाला होता. यासोबतच गेल्या निवडणुकीत ज्या जागांवर पक्षाने विजय मिळवला होता, त्या जागांबाबतही रणनीती ठरविण्यात आली होती, मात्र तेथे विविध कारणांमुळे पक्ष कमकुवत असल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App