विनायक ढेरे
हाय प्रोफाईल गणेश दर्शनानंतर अमित शाह भाजप नेत्यांसमोर बोलून गेले आणि सगळं कसं त्यांना अपेक्षितच पुढे घडलंय. सगळा ठाकरे गट शाह यांच्या वक्तव्यावर तुटून पडलाय… अमित शहा यांची वक्तव्य तशीच झोंबणारी होती. राजकारणात सगळं सहन करा पण धोका सहन करू नका. एखाद्याला कानाखाली मारली तर शरीराला तात्पुरती इजा होते, पण त्याच्या घरासमोर जाऊन कानाखाली मारली तर जखम मनात खोलवर होते, हे अमित शाहांचे वाक्य शिवसेनेच्या ठाकरे गटाला जबरदस्त टोचल्याचे दिसत आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून एक दोन नव्हे तर सात – आठ नेते एकदम अमित शाह यांच्यावर तुटून पडले आहेत. Amit shah targets Uddhav Thackeray, Shivsena leaders redacted strongly
ते अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातल्या शिवसेनेची आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपची आठवण करून देत आहेत. अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, किशोरी पेडणेकर, मनीषा कायंदे हे सगळे नेते अमित शाह यांच्या झोंबणाऱ्या वक्तव्यावर तुटून पडले आहेत. या सर्व नेत्यांच्या प्रत्युत्तरातला सगळ्यात “कॉमन फॅक्टर” असा की शिवसेनेचे बोट धरून भाजप महाराष्ट्रात मोठा झाला. शिवसेनेचे पाय जमिनीवरच आहेत, पण भाजपचे हात मात्र आभाळाला टेकले आहेत. त्यामुळे आज अमित शाह यांनी भाजपला जरी मुंबई महापालिकेच्या 150 जागांचे टार्गेट दिले असले तरी मूळात ही शिवसेनेच्या मूळ टार्गेटची अर्थात उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या टार्गेटची कॉपी आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या टीकेमध्ये जरूर तथ्य आहे, पण ते अर्धतथ्य आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात भाजप शिवसेनेची बोट धरून महाराष्ट्रात मोठी झाली हे खरेच. ते भाजपच्या नेत्यांनी कधीही नाकारले नाही आणि त्यांनी नाकारले तरी वस्तुस्थिती बदलत नाही. पण मग त्या पुढची वस्तुस्थिती मात्र शिवसेनेच्या नेत्यांना अधिक टोचणारी आहे. बाळासाहेबांचे बोट धरून भाजप मोठा झाला. पण तो एवढा मोठा झाला की शिवसेना त्यापुढे छोटी ठरली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्टर्स लावून शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून यावे लागले, त्याचे काय?? हा खरा प्रश्न आहे!!
Amit Shah : : महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रात काशीएवढीच पवित्र ! अमित शाहंचे गौरवोद्गार ; सहकारासाठी मोदी सरकार २४ तास ३६५ दिवस उपलब्ध
अमित शाह यांनी इथेच नेमका वर्मावर घाव घातला आहे आणि त्या वर्मावरच्या घावाला शिवसेनेच्या ठाकरे गटाने उत्तर दिलेले नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे नावाचे ब्रह्मास्त्र शिवसेनेकडे होते हे खरेच, पण आज नरेंद्र मोदी नावाचे ब्रह्मास्त्र भाजपकडे आहे आणि त्या ब्रह्मास्त्रापुढे उद्धव ठाकरे यांचे अस्त्र चालत नाही ही खरी खंत आहे!!
अमित शहा यांनी मुंबईत येऊन वर्मावर घाव घातला. त्यावर अंबादास दानवे यांनी अमित शहा यांना मुंबईत यावे लागले, हा शिवसेनेचा नैतिक विजय आहे असे वक्तव्य केले आहे. आता अंबादास दानवे यांचे हे वक्तव्य राजकीय विजयातून आले असे म्हणायचे की पराभवातून??, कारण कोणताही पक्ष पराभूत झाला की नैतिकतेची भाषा सुरू करतो, हा राजकीय इतिहास आणि वास्तव आहे. निवडणुकीतले सगळे “पडेल उमेदवार” नेहमीच आपला “नैतिक विजय” झाल्याच्या बाता मारत असतात. अंबादास दानवे यांचे वक्तव्य खरे मानले तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपला नैतिक विजय म्हणताना प्रत्यक्ष राजकीय भूमीवरचा पराभव स्वीकारला आहे का?? आणि तो देखील मुंबई महापालिका निवडणुका प्रत्यक्ष जाहीर होण्यापूर्वी स्वीकारला आहे का?? हा प्रश्न आहे. हिंदीत “सौ सुनार की एक लोहार की” अशी म्हण आहे. त्याच्या उलट “एक अमित शाह की आणि दस ठाकरे गट की” असे म्हणायची वेळ ठाकरे गटाने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमधून आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App