प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण याच निमित्ताने आता राज्य सरकारी कर्मचा-यांना सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे आता 29 ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचा-यांचा पगार होणार आहे. 29th August 2022 : Salary of government employees in Maharashtra before Ganeshotsav!!
राज्य सरकारचा निर्णय
गणेशोत्सव साजरा करताना कर्मचा-यांना अडचणी येऊ नयेत म्हणून महिना संपण्यापूर्वीच राज्य सरकारी कर्मचा-यांचा पगार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक काढत यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी निर्णय
कोविडमुळे गेली दोन वर्षे सण समारंभांवर बंधने घालण्यात आली होती. पण यंदा कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे सर्व सण धुमधडाक्यात करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. दहीहंडी उत्सवानंतर आता गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे अनेकांना बाप्पाच्या स्वागतासाठी विविध खरेदी करायची आहे. तसेच अनेक जण हे गणेशोत्सवानिमित्त गावी देखील जात असतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांना हा उत्सव आनंदाने साजरा करता यावा, म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचा पगार 29 ऑगस्ट रोजी करण्याचे ठरवले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App