विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी एका दिवसापुरता जनता कर्फ्यू पुरेसा नाही. ही एक दीर्घकालीन लढाई आहे. तिला गांभीर्याने समजावून घ्या. लॉक डाऊनचा अर्थ समजून त्या प्रमाणे वर्तणूक ठेवा. राज्य सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. कालच्या जनता कर्फ्यूला भारतीयांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. सायंकाळचे “आभार थाळीवादन, टाळीवादन, शंखवादनही” अभूतपूर्व झाले. ९५ टक्क्यांहून अधिक नागरिकांनी संयम पाळला पण २ – ५ टक्के नागरिकांनी अतिउत्साहात या घटनेचे सेलिब्रेशन केले ते मोदींना रुचलेले नाही. अशा अतिउत्साहातून ढोलवादनासारखे प्रकार घडले. काही ठिकाणी नागरिकांनी जमावाने एकत्र येत वादन केले. हा नुसता औचित्यभंग नव्हता, तर ते वैद्यकीय प्रतिबंधक उपायांच्याही विरोधात होते. सेलिब्रेशनच्या सूचना मोदींच्या नव्हत्या. पण सेलिब्रेशनमुळे समाजात मात्र चुकीचा संदेश गेला.
आजही महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लॉक डाऊन जाहीर केले आहे. पण अनेक ठिकाणी विशेषत: मुंबईत त्याचे उल्लंघन दिसून आले. दोन कि. मी. च्या वाहनांच्या रांगा मुलुंडसारख्या ठिकाणी दिसल्या. टोल नाक्यांवरही वाहनांची गर्दी दिसली. राज्यात १४४ कलम लागू आहे. असे असताना लोकांनी असे एकत्र येणे अपेक्षित नाही. त्यामुळेच मोदींनी ट्विट करून, लोकांना लॉक डाऊनचे गांभीर्य आहे का नाही, असा प्रश्न विचारला आहे. कोरोनाविरोधात भारतासह जगाला दीर्घकालीन लढाई लढावी लागणार आहे. त्याचे वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक परिणामही असेच दीर्घकालीन असणार आहेत. कालचा जनता कर्फ्यू या लढाईची सुरवात आहे. कोरोनाच्या परिणामांना सर्व पातळ्यांवर तोंड द्यायचे आहे.
अति आवश्यक सूचना➡️राज्यों से #lockdown को सख्ती से लागू करने के लिए कहा गया है➡️उल्लंघन करने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी#IndiaFightsCorona , #HelpUsToHelpYou https://t.co/0U8nrJr3xu— पीआईबी हिंदी (@PIBHindi) March 23, 2020
अति आवश्यक सूचना➡️राज्यों से #lockdown को सख्ती से लागू करने के लिए कहा गया है➡️उल्लंघन करने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी#IndiaFightsCorona , #HelpUsToHelpYou https://t.co/0U8nrJr3xu
त्यासाठी संयम आणि गांभीर्याची गरज आहे, अशा आशयाचे ट्विट मोदींनी काल केले होते. पण कालचा अतिउत्साह आणि आजचे लॉक डाऊनचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांना कठोरातले कठोर उपाय करावे लागतील, याचे सूतोवाच मोदींच्या आजच्या ट्विटमध्ये दडलेले आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मोदींच्या ट्विट आवाहनाला प्रतिसाद देत
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते विनोद तावडे यांनी सरकारने दिलेली सुरक्षा सोडली, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुरक्षा सोडत असल्याची दिली माहिती, लॉकडाऊनच्या कामासाठी अतिरिक्त बळ वापरता यावं यासाठी निर्णय घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App