वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरात मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कित्येक हजारो कोटी रूपयांचे विविध प्रकारचे ड्रग्ज गुजरातच्या बंदरावरून जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने ड्रग्ज पकडण्यात आले आहे. दरम्यान गुजरात एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. Drugs worth Rs 1125 crore seized in Baroda in Gujarat; 5 factory owners arrested
गुजरात एटीएसने बडोदे शहरात छापे टाकून 1125 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन अशाच एका कारवाईत 1200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने बडोद्यातील एका बांधकाम सुरु असलेल्या फॅक्टरीवर मंगळवारी छापा टाकला इथून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 225 किलो मेफेड्रोन ज्याची किंमत 1 हजार 125 कोटी रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 लोकांनाही ताब्यात घेतल्याची माहिती गुजरात एटीएसचे पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांनी दिली.
जप्त करण्यात आलेले अंमलीपदार्थ भरुच येथील गुजरात औद्यागिक विकास महामंडळ अर्थात जीआयडीसी सायखा इथल्या एका केमिकल कंपनीमध्ये तयार करण्यात आले आहेत. ज्या फॅक्टरीमधून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे ती फॅक्टरी सुरत येथील महेश वैश्नव आणि वडोदरा येथील पियूष पटेल नामक व्यावसायिकांच्या मालकीची आहे. तसेच राकेश मकानी, विजय वसोया आणि दिलीप वघासिया हे भरुच इथल्या प्रकल्पाचे मालक आहेत. या सर्व प्रकल्पाच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App