वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महागाईवर लगाम लावण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न काहीसे यशस्वी होताना दिसत आहेत. किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईही घटली आहे. मंगळवारी जारी केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार जुलैमध्ये घाऊक महागाई दर १३.९३% राहिला. हा जूनमध्ये १५.१८% होता.Wholesale inflation rate at 13.93% in July, food prices down, wholesale inflation at record low
दुसरीकडे, या वर्षी मेमध्ये हा १५.८८% च्या विक्रमी उंचीवर होता. गेल्या तीन महिन्यांपासून सलग घाऊक महागाई दर १५% वर राहिला. तो सलग १६ महिन्यांपासून दोन आकड्यात आहे. महागाई कमी होण्याचे मोठे कारण खाद्यसामग्री आणि मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांच्या किमतीतील घट आहे.
खाद्य महागाई जुलैमध्ये १०.७७% नोंदली, ही याआधी म्हणजे जूनमध्ये १४.३९% होती. मात्र, इंधन आणि विजेचा महागाई दर जूनच्या ४०.३८% वरून वाढून ४३.७५% राहिला. मॅन्युफॅक्चर उत्पादनांमध्ये महागाई ८.१६% आणि तेलबियांत -४.०६% राहिली.
अमूल, मदर डेअरीची २ रुपये प्रति लिटर वाढ
अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या किमती 2 रु. प्रतिलिटरने वाढवल्या आहेत. नव्या किमती बुधवारपासून लागू होतील. गुजरात सह.दूध विपणन संस्थेनुसार, अमूलचे सर्व दूध ४% महागले आहे. यानंतर मदर डेअरीनेही किमतीत २ रु. लिटर वाढ केली. संस्थेनुसार, शेतकऱ्यांच्या देयकाच्या तुलनेत प्रतिलिटर २ रु. वाढ कमी आहे. दोन्ही कंपन्यांनी या वर्षी दुसऱ्यांदा दरवाढ केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App