वृत्तसंस्था
पाटणा : बिहारमधील राजकारणाला कलाटणी देण्याची तयारी सुरू आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. यावरून जाणकारांचे म्हणणे आहे की 11 ऑगस्टपूर्वी बिहारमध्ये एनडीएचे सरकार पडेल आणि नितीश पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करतील. जेडीयूने आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना मंगळवारी पाटणा येथे बैठकीसाठी बोलावले आहे.Jdu-BJP tensions rise in Bihar Nitish Kumar ready to break the alliance? Called meeting of all MLAs and MPs
मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. 10 ते 12 तारखेदरम्यान तेजस्वी यादव यांनीही आपल्या सर्व आमदारांना पाटण्यात राहण्याच्या सूचना दिल्या असून आमदारांची बैठकही तेजस्वी यांनी बोलावल्याचे वृत्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी देऊन राजदसोबत जाणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली असून मुख्यमंत्री नितीशकुमार राहतील, मात्र यावेळी उपमुख्यमंत्री नसतील अशी तयारीही पूर्ण झाली आहे. तेजस्वी यादव यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी असू शकते, अशीही सूत्रांची माहिती आहे.
पुढेच काही दिवस बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सिवानमधील आरजेडीचे आमदार अवध बिहारी चौधरी विधानसभेचे अध्यक्ष असतील. विद्यमान अध्यक्ष विजय सिन्हा आज कोरोनाचे बळी ठरले आहेत. आता या चर्चा किती खऱ्या हे येत्या एक-दोन दिवसांत ठरेल, पण येणारे काही दिवस बिहारच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांनी बिहारमध्ये मोठी सभा घेतली आहे. रोड शो केला आणि नंतर घोषणा केली की 2024 आणि 25 नंतरही JDU सोबत युती होईल.
पण नितीशकुमार ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते, सभा, राष्ट्रपतींची मेजवानी, राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा नीती आयोगाच्या बैठकांना अनुपस्थिती लावत आहेत, त्यामुळेही या चर्चांना बळ मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App