शरद पवारांच्या नादी लागून संजय राऊतांकडून शिवसेनेचे वाटोळे; संजय शिरसाटांचा घणाघात

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी रविवारी सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या राऊतांची त्यांच्या भांडुपमधल्या मैत्री या बंगल्यात चौकशी सुरू आहे. यावर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Sharad Pawar’s Nadi Shiv Sena by Sanjay Raut

शिवसैनिक आज आनंदी

संजय राऊत हे अत्यंत हुशार नेते आहेत. त्यांना ईडीची भीती वाटत नाही, असा खोचक टोला शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावला आहे. ईडीची जेव्हा एवढी मोठी धाड पडते तेव्हा अटक होण्याची शक्यता जास्त असते. शिवसैनिक आज आनंदी झाले असतील. ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेनेचे ४० आमदार १२ खासदार गेले ते सर्व आनंदी आहेत. संजय राऊत हे फक्त प्रवक्ते आहेत. मास लीडर नाहीत, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे.

तसेच कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे संजय राऊतांच्या या ट्विटबाबत शिरसाट म्हणाले, बाळासाहेबांची शपथ घेण्याएवढा मोठा माणूस तो नाही, बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. आम्ही या शिवसेनेत ४० वर्ष आहोत. तुम्ही शिवसेना सोडू नका एक दिवस हीच शिवसेनेतून तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल तेव्हा त्यांना त्यांची जागा कळेल, असे शिरसाट म्हणाले.

– पवारांच्या नादी लागून शिवसेनेचे वाटोळे

संजय राऊतांवर एवढा संताप का?, असा प्रश्न केल्यावर शिरसाट म्हणाले, याच माणसाने शरद पवारांच्या नादी लागून शिवसेनेचे वाटोळे केले. ज्यावेळी उद्धव ठाकरेंना आम्ही शिवसेना राष्ट्रवादीची संगत आपल्याला नको असे सांगायचं तेव्हा हाच माणूस राष्ट्रवादीबरोबर त्यांना जायला लावायचा. त्याच्याचमुळे आज शिवसेनेचे 40 आमदार आणि बारा खासदार उद्धव साहेबांबरोबर नाहीत. म्हणून संजय राऊतां विरोधात शिवसैनिकांमध्ये संताप आहे.

Sharad Pawar’s Nadi Shiv Sena by Sanjay Raut

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात