प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील ८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून राज्यातील पूर आणि आपत्कालीन परिस्थिती बघता शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील याच पद्धतीने पुढे ढकलल्या आहेत. Elections of 8000 cooperative societies postponed
राज्य सरकरने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. तसेच पावसामुळे ८९ व्यक्तींचे निधन झाले आहे.
राज्यातील अतिवृष्टी होत असल्याने २४९ गावे बाधित झाले आहेत. पावसामुळे होणारे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील मुसळधार पावसाचा फटका सहकारी संस्थांना बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App