काल सोमवारी मोदींनी निर्माणाधिन संसद भवनाच्या छतावर उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केले आणि काॅंग्रेस पासून AIMIM पर्यंत तमाम विरोधकांना मिरची लागली. विरोधकांचे आक्षेप आणि त्यांची उत्तरे खालील प्रमाणे आहेत. Pepper to Ashok Stambh and opponents …
१. संसदेच्या छतावरील अशोक स्तंभाचे अनावरण मोदींनी का केले? लोकसभा अध्यक्षांनी का नाही केले? संसदेचा विचार करता लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा उपाध्यक्ष ही दोन्ही पदे महत्वाची आहेत. दोघांपैकी कुणी एकाने अनावरण केले असते तरीही दुसऱ्या च्या नावाने ओरडा केलाच असता विरोधकांनी. शिवाय संसदेची इमारत निर्माणाधिन आहे. पुर्ण झाली नाही. पुर्ण होईल तेंव्हा ती संसदेच्या पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली जाईल. तोवर ती केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. त्या दृष्टीने मोदींनी अनावरण करणे योग्यच.
२. विरोधी पक्षांच्या नेत्यांना का नाही बोलावले? संसद काय भाजपची आहे का? अनावरण प्रसंगी भाजपचे पदाधिकारी उपस्थित नव्हते तर लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि शहरी विकास मंत्री उपस्थित होते. संसदेच्या छतावरील एका शिल्पाचे उद्घाटन हा काहीसा अनौपचारिक समारंभ. त्यासाठी गाव गोळा करण्याची काय गरज? आणि हो GST काही भाजपचा नव्हता. देशाचाच होता. पण त्या कार्यक्रमावर काॅग्रेस आणि तृणमूल ने बहिष्कार घातला होता. अनावरण कार्यक्रमावरही त्यांनी बहिष्कार घातला असता ही शक्यता गृहित धरून त्यांना नाही बोलावले तर काय बिघडले?
३. अनावरण प्रसंगी पूजा का केली? संसदेच्या छतावरील अशोकस्तंभाचे अनावरण करून तीथे विधिवत पूजा करण्यात आली. विधिवत पूजा करून चांगल्या कामाची सुरुवात करणे जसे धार्मिक आहे तसेच सांस्कृतिक आहे. इतर पंथ/धर्म देशात येण्याच्या हजारो वर्षे आधीपासून देशात यज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रम होत आले आहेत. त्याच वंदनीय परंपरेप्रमाणे मोदींनी पूजा केली. आणि हो इतर धर्मात अशोकस्तंभभाचे अनावरण करताना कोणते विधी करावेत या संबंधी धर्म ग्रंथात काही सांगितले असेल तर कळू द्या. या नंतर पुढच्या वेळी त्याचा विचार करता येईल!
भोंदू धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा काढून टाकून भारताचा मूळचा सांस्कृतिक चेहरा समोर येतो आहे. आणि हा चेहरा सनातन धर्माचा आहे, प्राचीन भारतीय संस्कृतीचा आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे.
नवे संसद भवन होणारच. आणि नव्या संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपचेच बहुमत असणार. तसेच पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानात मोदीच रहायला जाणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे ही विरोधकांनी समजून घ्यावे. नव्या संसदेच्या उद्घाटन प्रसंगी विरोधकांनी बर्नाॅलच्या टाक्यांतच बसून रहावे. बुडाला आग लागून त्याचा कोळसा होणार आहे ही पण काळ्या दगडावरची रेघ आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App