विशेष प्रतिनिधी
श्रीलंका : प्रचंड महागाई आणि प्रचंड टंचाईने होरफळलेल्या जनतेचा उद्रेक होऊन आज जनतेनेच श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान “जनाधिपती मंदिरय्या” या ताब्यात घेऊन टाकले. पण श्रीलंकेतला हा उद्रेक अचानक उद्भवलेला नाही. चीनच्या तब्बल 35 अब्ज डॉलरच्या कर्जाच्या खाली बुडालेली श्रीलंका असंतोषाने खदखदच होतीच. मध्यंतरी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे घर जाळण्यापर्यंत जनतेची मजल गेली होती. पण आता त्या पलीकडे जाऊन जनतेने राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांचे अधिकृत निवासस्थान “जनाधिपती मंदिरय्या” ताब्यात घेतले आहे. Sri Lanka Crisis: Debt looted, people looted; The dynasty of the Rajapaksas drowned Sri Lanka
पण ही वेळ राजपक्षे यांच्या घराणेशाहीनेच श्रीलंकेवर आणली आहे. एकीकडे श्रीलंका कर्जाच्या खाईत लोटली जात असताना दुसरीकडे लंकेच्या तिजोरीची लूट राजपक्षे यांच्या घराण्यातील अधिकारी वर्ग करत होता त्याचा हा लेखाजोखा :
– श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांना “जनाधिपती मंदिरय्या” निवासस्थानातून पोबारा करावा लागला आहे. गेल्या महिन्यात संतप्त जमावाने राजपक्षे यांचे छोटे बंधू माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे घर जाळले होते. त्यानंतर महिंदा यांनी कुटुंबासह पळ काढून एका नौदल तळावर आश्रय घेतला होता.
INDIA-SHRILANKA : अशोक वाटिकेतून सीता मातेची ही खूण पोहचली थेट अयोध्येत; श्रीलंकेचे दोन मंत्री-राजदूत-उप राजदूत भारतात पोहचले
– चार भाऊ, एक पुतण्या सत्ता एकवटली
– याच राजपक्ष घराण्यातले पाच सदस्य श्रीलंकेचे सत्ताधीश होते. यात राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे, अर्थमंत्री बासिल राजपक्षे, सिंचन मंत्री चामल राजपक्षे आणि क्रीडा मंत्री नामल राजपक्षे यांचा समावेश होता. यातील राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्ष वगळता सर्वांनी राजीनामे दिलेत. पण गोटाबाई राजपक्ष यांनी राजीनामा न देताच पोबारा केला आहे.
– 70 % बजेटवर नियंत्रण
– यात राजपक्षे घराण्याचे श्रीलंकेच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पाच्या 70 % थेट नियंत्रण होते. राजपक्षे कुटुंबावर 5.31 अब्ज डॉलर्स म्हणजे 42 हजार कोटी रुपया रुपयांच्या गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. हे पैसे त्यांनी श्रीलंकेबाहेर नेले आहेत. यात महिंदा राजपक्षे यांचे निकटवर्तीय अजित निवार्ड कबराल यांनी महत्वाची भूमिका बजावली. कबराल हे सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेचे गव्हर्नर होते.
– महिंदा राजपक्षे
76 वर्षीय महिंदा राजपक्षे समुहाचे प्रमुख होते. काही महिन्यांपूर्वीपर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यांना आंदोलनामुळे 10 मे रोजी राजीनामा द्यावा लागला. त्यांनी 2004 मध्ये पंतप्रधानपद भूषवले. त्यानंतर 2005 ते 2015 पर्यंत सलग 10 वर्षे ते लंकेच्या राष्ट्रपतीपदी राहिले. या काळात त्यांनी आपले बंधू गोटबाया राजपक्षे यांना तमिळ आंदोलन चिरडून टाकण्याचे आदेश दिले होते.
– याच महिंदा राजपक्षेंच्या नेतृत्वात श्रीलंका – चीनची जवळीक वाढळी. त्यांनी चीनकडून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्साठी तब्बल 7 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले. यातले बहुतांश प्रकल्प केवळ कागदावर होते. त्यांच्या नावे त्यांनी अमाप भ्रष्टाचार केला. त्यांना राजपक्ष घराण्यात “द चीफ” म्हटले जात होते.
– गोटबाय राजपक्षे
माजी लष्करी अधिकारी गोटबाया यांनी 2019 मध्ये श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली. ते श्रीलंकेचे संरक्षण मंत्री होते. 2005-2015 या काळात त्यांनीच तामिळींचे एलटीटीईचे आंदोलन निर्दयीपणे मोडून काढले.
– बासिल राजपक्षे
71 वर्षीय बासिल राजपक्षे अर्थमंत्री होते. ते श्रीलंकेतील सरकारी कंत्राटात कथित कमिशन घेण्यासाठी कुप्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांना ‘मिस्टर 10 पर्सेंट’ म्हटले जाते. हेच नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि बेनझीर भुट्टो यांचे पती आसिफ अली झरदारी यांनाही मिळाले होते. बासिल राजपक्षे हे श्रीलंकेचे अर्थमंत्री होते. ते भ्रष्टाचारात आकंठ बुडाले होते. त्यामुळे लाचखोरीच्या बाबतीत त्यांना मिस्टर-10 पर्सेंट म्हटले जात होते.
– चामल राजपक्षे
79 वर्षीय चामल महिंदा राजपक्षेचे मोठे बंधू आहेत. त्यांनी शिपिंग आणि एव्हिएशन मंत्रालयाचा कारभार पाहिला आहे. आतापर्यंत ते सिंचन मंत्रालयाचा पदभार सांभाळत होते. चामल यांनी जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके यांचे अंगरक्षक म्हणूनही काम केले आहे. चामल राजपक्षे यांचाही बंधूंत श्रीलंकेला लुटण्यात मोठा वाटा होता.
– नामल राजपक्षे
35 वर्षीय नामल हे महिंदा राजपक्षेंचा मोठा मूलगा आहेत. 2010 मध्ये अवघ्या 24 व्या वर्षी ते खासदार झाला. आतापर्यंत तो क्रीडा आणि युवक मंत्री होता. त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे.
– एकीकडे चिनी कर्जात बुडवले, दुसरीकडे लुटले
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App