नशीब आणि कर्तृत्व : ठाकरे सरकारच्या एक्झिट नंतर राज ठाकरेंचे ट्विट चर्चेत!!

प्रतिनिधी

मुंबई : “नशीब आणि कर्तृत्व” ठाकरे सरकारच्या एक्झिट नंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. Raj Thackeray’s tweet in discussion after Thackeray government’s exit

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचे नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी भाष्य केले आहे. राज ठाकरेंची ही पहिली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होता, असे म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधल्याचे दिसतेय, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवस सुरू असलेल्या राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले. ऐन राजकीय भूकंपात राज ठाकरे हे रूग्णालयात दाखल होते. त्याच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. यादरम्यान राज्यातील घडामोडींना वेग आला असताना त्यांना लिलावतीमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. रूग्णालयातून परत आल्यानंतर राज ठाकरेंनी सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेवर कोणतेच भाष्य केले नव्हते. अखेर आज त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याचे पाहायला मिळाले.

Raj Thackeray’s tweet in discussion after Thackeray government’s exit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात