प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत यांनी केलेल्या विविध वक्तव्यांचा हवाला सुप्रीम कोर्टात राज्यपालांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिला. Sanjay Raut’s statement in the Supreme Court rent !! His own confession of losing the majority
शिवसेनेचे 40 आमदार गुवाहाटीला गेलेत. तिथे कामाख्या मंदिर आहे. तिला रेडे बळी देण्याची प्रथा आहे. आम्ही इकडनं 40 रेडे तिकडे पाठवलेत. तिथेच त्यांचे बळी द्या. त्यांचे मृतदेह इकडे परत आणू, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.
त्या वक्तव्याचाच हवाला देऊन तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू सुप्रीम कोर्टात ना मांडली संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून जर राज्यपालांनी आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी काही भाष्य केले असेल तर ते गैर कसे मानता येईल?, असा सवाल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात केला.
किंबहुना संजय राऊत यांच्या या वक्तव्याची दखल वेगळ्या प्रकारे देखील तुषार मेहता यांनी घेतली. 40 आमदार गुवाहाटीला गेल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी करणे याचा अर्थ संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे गट अल्पमतात असल्याची कबुलीच देणे आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे, याकडे तुषार मेहता यांनी लक्ष वेधले आहे शिवसेनेत शिंदे गट बहुमतात आहे. यासाठी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा हाच पुरावा गृहीत धरावा, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे.
– शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद
तर इथे फक्त महाविकास आघाडी सरकार अल्पमतात नाही तर शिवसेना नावाचा पक्षच विधिमंडळात अल्पमतात आला आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे शिवसेना शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले 39 आमदार आहेत असा युक्तिवाद एकनाथ शिंदे गटाचे वकील कौल यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App