प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू असून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड ठाकरे – पवार सरकारवर भारी पडणार असल्याची सध्याची राजकीय परिस्थिती दिसतेय. सरकार अल्पमतात आले असून आपल्याकडे जास्त आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. कोणाचे सरकार राज्यात असेल आणि यंदाची महापूजा कोणाच्या हस्ते होणार यावर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. Devendra Fadanavis to perform aashadhi ekadashi pooja at pandharpur vitthal mandir, claims BJP MP pratap patil chikhlikar
महापूजा फडणवीसच करणार
नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आज, मंगळवारी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन करण्यासाठी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांना आषाढीची महापूजा कोणाच्या हस्ते होणार असे विचारले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस हे पूजा करतील, असे उत्तर दिले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होऊदे आणि त्यांच्या हस्तेच महापूजा होऊदे असे विठुरायाकडे साकंड घातल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दोन-तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असताना नवं सरकार येणार की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच भाजपचे खासदार चिखलीकर यांनी मोठी माहिती दिली आहे. येत्या दोन-तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल, शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि सोबतचे बंडखोर आमदार यांच्या मदतीने भाजप सत्तेत येईल, त्यांच्यासोबच शिवसेनेचे १० ते १२ खासदार सोबत येतील असा गौप्यस्फोट देखील चिखलीकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्दावर बंड केले आहे.
55 पैकी 40 च्यावर आमदार त्यांच्यासोबत आहे. मतदारसंघामध्ये विकास व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. राज्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपचे सरकार आले तर विकासाची कामे होतील. या भावनेतून किमान 10 ते 12 खासदार शिंदे यांच्यासोबत निश्चित जातील असं वाटतं, असं मत चिखलीकर यांनी व्यक्त केलं
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App