वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातील सैन्य शक्तीचे आधुनिकीकरण आणि युवकांना देशसेवेची संधी देण्याच्या दृष्टीने केंद्रातल्या संरक्षण मंत्रालयाने अग्निपथ योजना तयार केली असून युवकांना 4 वर्षांसाठी अग्निवीर म्हणून देशातील सैन्यदलामध्ये सेवा करण्याची संधी या योजनेतून मिळणार आहे. या संदर्भातली संपूर्ण योजना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सैन्य दलाच्या तीनही प्रमुखांनी जाहीर केली आहे. या योजनेच्या सुरुवातीला तब्बल 45 हजार युवकांची भरती अग्निवीर म्हणून करण्यात येणार आहे यानंतर टप्प्याटप्प्याने भरतीची संख्या वाढवली जाईल. Government announces Agneepath plan; Great career opportunity in the military
अग्निपथ योजनेतून अग्निवीरांसाठी 4 वर्षांसाठी सुरुवातीची भरती करून त्यानंतर त्यांना आपल्या जीवनात सेटल होण्यासाठी भारतीय सैन्यदल मदत करीत यासाठी सुरुवातीचे दरमहा वेतन 30 हजार रुपये असून चार वर्षानंतर 40 हजार रुपये करण्यात येईल. तसेच सरकार आपली रक्कम टाकून 4 वर्षांनंतर सैन्य सेवेतून बाहेर पडणाऱ्या युवकांना एकूण 10 लाख रुपयांची रक्कम हातात देईल.
अग्निवीरांच्या 4 वर्षांच्या सेवेनंतर त्यांचे मूल्यमापन करून त्यांना दीर्घकाळ म्हणजे 15 वर्षे सेवेची संधी देखील उपलब्ध होऊ शकेल. 4 वर्षे सेवा केलेल्या अग्निवीरांना पेन्शन मिळणार नाही. परंतु दरमहा 4 वर्षे वेतन आणि 4 वर्षाच्या अखेरीस एकरकमी 10 लाख रुपये असे हे पॅकेज असणार आहे.
अग्निवीरांना सैन्यदलाच्या विविध कामांचे प्रशिक्षण संरक्षण मंत्रालय देणार आहे. यामध्ये सेवा निधी पॅकेज बरोबर दुर्घटना पॅकेज याचा देखील समावेश आहे.
अग्निपथ योजनेतून अग्निवीरांना उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कौशल्य विकसन आणि प्रत्यक्ष कामाची संधी उपलब्ध असणार आहे. यातून नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊन भारतीय सैन्य दलाला उत्तम दर्जाच्या प्रशिक्षण प्रशिक्षित सैन्याची सेवा उपलब्ध होणार आहे.
अग्निपथ योजनेतून भारतीय सैन्य दलाचे वयाचे प्रोफाईल देखील बदलणार असून ते 32 ऐवजी 26 होणार आहे. सैन्यदलाला जास्तीत जास्त तरुण अधिकाऱ्यांची गरज आहे या योजनेतून भागवली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App