राज्यसभा निवडणुकीला अवघा एक दिवस उरला असताना शिवसेना आणि भाजप त्यांच्यातल्या संघर्षाच्या आणि एकेका मतांच्या प्रचंड खेचाखेचीच्या बातम्यांनी मराठी प्रसार माध्यमांना व्यापून टाकले आहे. Shivsena supported NCP in last rajyasabha elections, but will NCP whole heartedly support Shivsena in 2022 rajyasabha elections??
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकमेकांविरुद्ध कसे डाव-प्रतिडाव रचत आहेत, एकमेकांची मते खेचण्यासाठी कोणते फासे, कसे फेकले जात आहेत, याची रसभरीत वर्णने आणि व्हिडिओ मराठी प्रसार माध्यमांना व्यापून उरले आहेत!! अनेक विश्लेषणकर्ते उघडून डोळे नीट बघत आहेत. पण या सगळ्यांमध्ये एका महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्याची चर्चा आज कुणी करताना दिसत नाही किंवा ती चर्चा अपवादात्मक होते आहे, ती म्हणजे दोनच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नसताना त्यांचे 2 उमेदवार बिनविरोध, बिनबोभाट राज्यसभेवर निवडून जातात आणि त्यानंतर दोनच वर्षांमध्ये जेव्हा शिवसेनेच्या जादा म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला राज्यसभेवर जाण्याची संधी येते तेव्हा मात्र या शिवसेनेच्या उमेदवारांसमोर संघर्षाचे ताट वाढून ठेवलेले असते!! एकेका मताच्या बेगमी साठी शिवसेनेच्या उमेदवाराला संघर्ष करावा लागतो. अख्खा पक्ष त्यासाठी कामाला लावावा लागतो, याचा नेमका अर्थ काय आहे??
– राष्ट्रवादीची निवडणूक बिनबोभाट
हेच दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या बाबतीत का घडू शकले नाही?? दोन वर्षांपूर्वी अशी कोणती जादूची कांडी फिरली की जिच्यामुळे राष्ट्रवादीचे 2 उमेदवार शरद पवार आणि फौजिया खान हे बिनविरोध, बिनबोभाट राज्यसभेवर पोहोचले??, तर शिवसेनेने कोणतीही खळखळ न करता बिनबोभाट पाठिंबा दिला ही ती जादूची कांडी होती!!
– जादूची कांडी कोण फिरवतेय?
मग आता दोन वर्षानंतर अशी जादूची कांडी राष्ट्रवादी काँग्रेसला फिरवता येईना का?? तिचा प्रभाव निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने पडत नाही का?? की जादूची कांडी फिरवली तर जाते आहे, पण तिचा प्रभाव नेमकेपणाने शिवसेनेच्या विरोधात होतो आहे??, हा खरे म्हणजे राज्यसभा निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे!! या मुद्द्याच्या उत्तरात राज्यसभा निवडणुकीचा निकाल आणि खरे राजकीय इंगित दडले आहे.
– राष्ट्रवादी मनापासून शिवसेनेच्या पाठीशी?
शिवसेना आणि भाजप यांचा संघर्ष हा त्या अर्थाने स्वतंत्र मुद्दा आहे. हा संघर्ष सुप्तावस्थेत पासून उद्रेकापर्यंत येऊन ठेपला आहे. पण इथे प्रश्न वेगळा आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने जसा राष्ट्रवादीला बिनबोभाट पाठिंबा दिला होता तसा यावर्षीच्या राज्यसभा निवडणुकीतल्या संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला खरंच बिनबोभाट पाठिंबा दिला आहे का??
राष्ट्रवादी आपल्या कोट्यातील सर्वच्या सर्व जादा मते पहिल्या प्राधान्यक्रमाने शिवसेनेचा दुसरा उमेदवाराला देणार आहे का?? की प्रफुल्ल पटेल यांचे स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्या प्राधान्य कर्माची जादा मते प्रफुल्ल पटेल यांना देऊन उरलेली जादा मते शिवसेनेच्या उमेदवार देणार आहे??, यावर विजयाचे बरेच गणित अवलंबून आहे. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला पाठिंबा देताना शिवसेनेने अशा गणिताचा विचार केला नव्हता.
– संभाजीराजे यांची एंट्री ते ऐन संघर्ष
राज्यसभा निवडणुकीत सातव्या उमेदवाराच्या एन्ट्री पासून, छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारी पासून ते आता प्रत्यक्ष संघर्षाच्या ऐन मध्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची कोणतीच भूमिका नाही का?? या विषयी मराठी प्रसार माध्यमांमध्ये फारशी चर्चा नाही. असलीस तर ती राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची चाणक्य बुद्धी आणि त्यावरची स्तुतिसुमने या स्वरूपाची आहे. परंतु, दोन वर्षांपूर्वी आपले काम साध्य झाल्यानंतर मित्रपक्षाला दोन वर्षानंतर सरळ आणि उघडपणे साथ देण्याऐवजी संघर्षाचे ताट मित्र पक्षासमोर कसे वाढून ठेवले जाईल, हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पाहिले आहे का??, या विषयी मराठी माध्यमातील कोणी चर्चा करताना दिसत नाही. म्हणून हा मुद्दा मांडला एवढेच!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App