प्रतिनिधी
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारी साठी शिवसेनेवर चहूकडून दबाव वाढला आहे. संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करण्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जादाची मते संभाजीराजांना दिल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीने वेगवेगळी राजकीय वळणे घेत शिवसेना चहूबाजूंनी दबावा पर्यंत गावापर्यंत येऊन ठेपली आहेत. Pressure on Shiv Sena for Sambhaji Raje’s candidature
शिवसेनेची उमेदवारी स्वीकारायची नाही यावर संभाजीराजे ठाम राहण्याच्या भूमिकेमागे विशिष्ट राजकीय शक्ती असल्याचे लपून राहिलेले नाही. त्याचबरोबर संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीच्या रूपाने राष्ट्रवादीकडे कल असलेला खासदार राज्यसभेत पाठविण्याचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मनसूबा देखील लपून राहिलेला नाही. शिवसेना नेतृत्व या मनसूब्याला चांगलेच ओळखून असल्यानेच अजूनही शिवसेनेने संभाजीराजांचे ऐकलेले दिसत नाही.
यातून मराठा संघटनांनी शिवसेनेवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. संभाजीराजे यांना पाठिंबा दिला नाही तर शिवसेनेला याचे राजकीय किंमत चुकवावी लागेल, असे इशारे मराठा संघटना देत आहेत. संभाजी मराजे देखील मुंबईत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत.
आता राज्यसभा नाही तर संपूर्ण राज्य ताब्यात घेणार अशी पोस्टर्स व्हायरल करून मराठा संघटनांनी शिवसेनेवर दबाव वाढवला आहे. यामागे नेमक्या कोणत्या शक्ती आहेत, हे आता महाराष्ट्राला माहिती झाले आहे, असे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना आपले पत्ते शेवटच्या क्षणापर्यंत खोलणार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांच्या ऐवजी संभाजीराजे यांना उमेदवारी जाहीर करून राज्यसभेत पाठवावे, असा सूर शिवसेनेतून बाहेर येऊ लागला आहे. संभाजीराजे यांच्या निमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी ठिणगी पडल्याचे दिसत आहे. आता ती विझणार की योग्य वेळेत तिचा वणवा होणार हे पाहणे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App