महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यावर राजकीय नेते विविध वक्तव्य करतातच, पण आता मराठी माध्यमे देखील त्यात जातीय अँगल आणून “खुसपट मरोडी” करायला लागली आहेत. नेत्यांची वक्तव्य तोडून – मरोडून पेश करण्याची मराठी माध्यमांमध्ये स्पर्धा आहेच… त्यात आज रावसाहेब पाटील दानवे आणि अजितदादांच्या वक्तव्यांमधून अर्थ काढून माध्यमांनी भर घातली आहे…!! Various statements by political leaders on who should be the Chief Minister of Maharashtra
त्याचे झाले असे… केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी परशुराम जयंतीच्या मेळाव्यात शिवसेनेच्या एका नेत्याला नेत्याच्या भाषणाला उत्तर देताना, ब्राह्मण समाजाचा नगरसेवक अथवा नगराध्यक्ष नाही तर मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य कोणा एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून नसून संपूर्ण समाजासाठी लागू आहे, असे रावसाहेब दानवे यांनी त्यावेळीच सांगितले होते. परंतु, मराठी माध्यमांनी त्यातला “ब्राह्मण मुख्यमंत्री” एवढाच भाग वायरल झालेल्या दाखवला.
नंतर या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवारांनी उत्तर दिले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी होऊ शकतो. ज्याच्या पाठीशी 145 आमदार असतील, ती व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते मग ती तृतीयपंथी असली तरी मुख्यमंत्री होऊ शकते अथवा कोणत्याही समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो. अजितदादांच्या वक्तव्यातला निवडक – वेचक “तृतीयपंथी मुख्यमंत्री” एवढाच शब्द उचलून मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी रावसाहेब दानवे यांना प्रतिप्रश्न केला. त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी माध्यमांची चांगलीच खरडपट्टी काढली.
मागचा-पुढचा विधानाचा संदर्भ न बघता तुम्ही राजकीय नेत्यांची विधाने दाखवता, असे त्यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीच्या तोंडावर सांगितले. तरी देखील एबीपी माझाच्या प्रतिनिधी अजित पवारांची प्रतिक्रिया कोणत्याही एका जातीच्या नेत्याला मुख्यमंत्री करणे बरोबर नाही, असे असल्याचे सांगितले. (जे मूळात अजित पवार बोलले नव्हते.) त्यावर रावसाहेब पाटील दानवे यांनी आपला टोला शिवसेनेच्या नेत्याला होता. तो बारामतीला का लागला??, असा प्रतिसवाल केला. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पाच वर्षे व्यवस्थित सांभाळले आहे. तेच आमचे नेते आहेत, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
पण एकूणच रावसाहेब पाटील दानवे आणि अजित पवार या दोघांची वक्तव्ये कोणत्याही विशिष्ट समाजाला किंवा गटाला दुखावणारे नव्हती तरी माध्यमांनी स्वतःची खुसपटी मरोडी काढून दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमधून वाद तयार करण्याचा प्रयत्न केलेला दिसला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App