छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाबद्दल गुणरत्न सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाबद्दल भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी सदावर्ते यांचा जबाब नोंदविण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. Maratha Kranti Morcha activists shouting slogans against Gunaratna Sadavarte
विशेष प्रतिनिधी
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाबद्दल गुणरत्न सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाबद्दल भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात गुरुवारी सदावर्ते यांचा जबाब नोंदविण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
गुणरत्न सदावर्ते यांनी एका चॅनेलवर 2020 च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाबद्दल आक्षेपार्ह विधाना केले होते. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणाच्या चौकशी करीता भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते जबाब नोंदविण्यास आले होते. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी जोरदार निदर्शने केली.
त्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी जबाब नोंदवून झाल्यावर,गुणरत्न सदावर्ते बाहेर पडले. मात्र प्रसार माध्यमांशी त्यांनी बोलणे टाळले.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विजय पुराणिक म्हणाले की,गुणरत्न सदावर्ते यांचा काल आणि आज जबाब नोंदविण्यात आला आहे. हा जबाब इन कॅमेरा झाला असून व्हाईस सॅम्पल देखील तपासासाठी घेण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App