वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना काळात मागील 2 वर्षे रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडू नये, म्हणून त्यांच्या रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता रिझर्व्ह बँकेने यंदा रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा रेपो दर 40 पॉइंट्सने वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची गृह आणि वाहन कर्जे महागणार आहेत. Home – Auto loans are expensive
महागाईमुळे रेपो दरात वाढ झाली
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन रेपो रेट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यासाठी रिझर्व्ह बँकेने 2 मे आणि 4 मे रोजी बैठक घेतली. त्यामध्ये 40 बेसिस पॉइंट्सने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी रेपो दर 4 टक्के होता, तो आता 4.40 % होईल, असे दास म्हणाले. ही दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने अर्थव्यवस्थेतील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत एमपीसीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दरात 0.40 % वाढ करण्याचा निर्णय घेतला.
एफडी गुंतवणुकदारांना फायदा होणार
अनियंत्रित महागाईमुळे हा रेपो दर वाढवण्यात आला आहे. मार्च 2022 मध्ये किरकोळ महागाई झपाट्याने वाढली आणि ती थेट 7 % वर पोहोचली, असे दास यांनी सांगितले. या व्याज दरवाढीमुळे कर्जाच्या हप्त्यांतही वाढ होणार आहे. रेपो दरात शेवटची कपात मे 2020 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून तो तसाच ठेवण्यात आला होता. कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) मध्ये 50 बीपीएसने वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे व्याज दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे. एफडी गुंतवणूकदारांना या वाढलेल्या व्याजदराचा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App