चीनच्या अध्यक्षांविरुद्ध पुण्याच्या वकिलांची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव, मुजफ्फरपूरच्या न्यायालयातही खटला चालणार

विशेष प्रतिनिधी

पुणे  :   करोना व्हायरस चीनमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असून, “बायो टेररिझमसाठी तो वापरण्यात येणार होता. मात्रतो प्रयोगशाळेत लीक झाल्यामुळे वुहान शहरातून त्याचा प्रसार झाला. या बद्दल चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा खटला चालवावा, अशी मागणी पुण्यातील वकील ऋषिकेश सुभेदार आणि आशीष पाटणकर यांनी हेगच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाला पत्र पाठवून केली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरच्या न्यायालयातही क्षी जिंगपिंग यांच्यावर खटला दाखल करून त्याची सुनावणी ११ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा त्रास सर्व जगाला सहन करावा लागतो आहेअसा दावा पुण्यातील दोन्ही वकिलांनी केला आहे. त्याबद्दल चीनचे राष्ट्रप्रमुख म्हणून क्षी जिंगपिंग यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खूनखुनाचा प्रयत्नलोकांच्या जीविताशी निष्काळजीपणे वागणे या गुन्ह्यांखाली आंतरराष्ट्रीय कोर्टाने कारवाई करावीत्यासाठी एक समिती नेमावीऍड. पाटणकर आणि ऍड. सुभेदार यांनी पत्र इंटरनॅशनल कोर्ट हेग आणि युनायटेड नेशन्सला पाठवले आहे. या कोर्टाला पाठवलेले पत्र जनहित याचिकेत त्वरित रुपांतरित करून घ्यावेअसेही यात नमूद करण्यात आले आहे.

मुजफ्फरपूरच्या न्यायालयातील याचिकेतही वरील स्वरुपाचे मुद्दे मांड़ण्यात आले असून त्याची दखल घेत न्यायाधीशांनी ११ एप्रिल रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात