प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काल दुपारी त्यांनी संयमी भूमिका घेतली. ईदच्या दिवशी महाआरती करू नका, असे ट्विट त्यांनी मनसैनिकांना उद्देशून केले होते. पण काल दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावराची समाधी या मुद्द्यावरून घेरले होते. Raj Thackeray’s aggressive stance against bells on mosques at Sambhajinagar assembly
कुणाल टिळक यांचे आवाहन
दुपारनंतर लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी या संदर्भात सविस्तर भूमिका मांडून रायगडावराची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असा आमच्या कोणताही दावा नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी कामात लोकमान्य टिळक यांचा मोलाचा वाटा होता. हे कुणाल टिळक यांनी आवर्जून स्पष्ट केले. यात सेनापती दाभाडे आणि औंधचे पंतप्रतिनिधी यांचाही वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राज ठाकरे यांना वेगवेगळे दावे करत ठोकून घेतले. तर त्यापुढे जात संभाजी ब्रिगेडने शरद पवार यांची भेट घेऊन आल्यानंतर राज ठाकरे यांच्यात थेट अटकेची मागणी केली. राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या वादानंतर कुणाल टिळक यांनी लोकमान्य टिळकांची बदनामी करणारा हा वाद थांबवा, असे आवाहन केले.
काल दिवसभर झालेल्या या घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज अक्षय तृतीया आणि ईद-उल-फित्र या दिवशी महाराष्ट्राचे गृह मंत्रालय ऍक्टिव्ह झाले असून तब्बल 75 हजार मनसैनिकांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. राज ठाकरे यांनी आपले निवासस्थान “शिवतीर्थ”वर एक बैठक बोलावली असून त्यामध्ये मनसेची पुढची स्ट्रॅटेजी ठरवण्यात येईल. कालच त्यांनी ट्विट करून याबाबतची भूमिका अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे आज स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते.
आजच्या बैठकीत काय निर्णय?
या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची असून राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मनसे विरुद्ध आक्रमक झाल्यानंतर नेमके कसे उत्तर द्यायचे यावर मनसेच्या बैठकीत विचारविनिमय होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक मध्ये राणा दांपत्याचे उदाहरण देत तशीच गत राज ठाकरे यांची करू, असा इशारा दिला आहे. त्यावर राज ठाकरे आणि मनसैनिक अशी प्रतिक्रिया व्यक्त करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App