विशेष प्रतिनिधी
मुंबई : मोदी सरकारने कोरोनाच्या साथीच्या काळात सतत नवनवीन कल्पना राबवून अर्थव्यवस्थेला गतिमान ठेवले. तरीही कोरोनामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या संकटावर मात करण्यासाठी तब्बल १२ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अहवालात म्हटले आहे.It will take 12 years for the economy to recover after the Corona strike, RBI reports
इतर देशांच्या तुलनेत साथीच्या लाटेचा सर्वाधिक फटका स्वयंरोजगार करणाऱ्यांना बसला. यात भारतानंतर इंडोनेशियालाही मोठा फटका बसला. किरकोळ विक्री, वाहतूक आणि आदरातिथ्य या क्षेत्राला फटका बसण्यात भारत जगात पाचव्या क्रमाकांवर आहे. मात्र, सरकारचा भांडवली खर्चावर सतत भर, डिजिटायझेशमध्ये वाढ, ई-कॉमर्स, स्टार्ट-अप्स, रिन्यूएबल आणि सप्लाय चेन लॉजिस्टिक यांसारख्या क्षेत्रात नवीन गुंतवणुकीच्या वाढत्या संधी यामुळे वाढीला हातभार लागला असल्याचे अहवालात म्हटले आहे.
कोरोनापूर्वी अर्थव्यवस्था वाढीचा दर ६.६ टक्के होता. आता मंदीची वर्षे गेल्यानंतर तो ७.१ टक्के आहे. प्रत्येक वर्षांसाठी उत्पादन तोटा २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ साठी अनुक्रमे १९.१ लाख कोटी, १७.१ लाख कोटी आणि १६.४ लाख कोटी रुपये झाला आहे. साथीचा रोग अद्याप संपलेला नाही. कोरोनाच्या ताज्या लाटेने चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपच्या अनेक भागांना तडाखा दिला आहे. भारतामध्येही धास्तीचे वातावरण आहे.
सरकारने पावले उचलल्याने शेती, मासेमारी, बांधकाम क्षेत्र, व्यावसायिक सेवा, सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा कोरोनाच्या तडाख्यातून सावरली आहेत. मात्र, व्यापार, हॉटेल्स, वाहतूक,संवाद सेवा, वीज, गॅस, उत्पादन, पाणीपुरवठा यांच्यावर झालेला परिणाम अद्याप संपलेला नाही, असेही अहवालात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App