विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : हिंदीविरोधी वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उडी घेतली आहे. हे करताना त्यांनी बॉलीवुडवर निशाणा साधला आहे. अभिनेता अजय देवगणला त्यांनी हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे की, सुदीप किच्चा सर, हे खरं आहे की, बॉलिवूड कलाकारांना दाक्षिणात्य कलाकांरांबद्दल ईर्षा वाटते. कारण कन्नड डबिंग चित्रपट केजीएफ २ ने ५० कोटीची ओपनिंग कमाई केली होती आणि अलिकडेच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांकडे पाहिलं तर दोन्हीतील फरक स्पष्ट दिसून येतो.Former Karnataka Chief Minister H. D. Kumaraswamy slammed Bollywood
सध्या सोशल मीडियार दाक्षिणात्य स्टार किच्चा सुदीप आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांच्या झालेल्या हिंदी राष्ट्रभाषा वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. कुमारस्वामी यांनी या वादात किच्चा सुदीपला पाठिंबा देत अजय देवगणचं वागणं हे हास्यस्पद असल्याचंही म्हटलं आहे.
कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. अजय देवगणनं ही गोष्ट मान्य करायला हवी की आता कन्नड चित्रपट हिंदी चित्रपटांवर वरचढ ठरत आहेत. पण दाक्षिणात्य लोकांच्या प्रोत्साहनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचा विकास झाला आहे. अजयने हे विसरू नये की त्याचा पहिला चित्रपट फूल और कांटे बेंगळुरूमध्ये एक वर्ष चालला होता.
अभिनेता किच्चा सुदीपचं हिंदी राष्ट्रभाषेच्याबाबतचं वक्तव्य चुकीचं नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे चुका काढण्याचं काहीच कारण नाही. अजय फक्त तापट स्वभावाचाच नाही तर त्याचं हे असं वागणंही खूप हास्यस्पद आहे जसं कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम आण मराठी या भाषा आहेत तशीच हिंदी ही देखील एक भाषा आहे. फक्त एक देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग ही भाषा बोलतो त्यावरून हिंदीला राष्ट्रभाषा मानता येणार नाही.
अजय देवगणने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,किच्चा सुदीप, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल. जन गण मन
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App