प्रतिनिधी
नवी दिल्ली : सत्य टोचते, पण आकडे बोलतातच, अशा शब्दांत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारला सुनावले आहे.Hardeep Singh Puri told the Thackeray-Pawar government
काल पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्र पश्चिम बंगाल तामिळनाडू आदी राज्यांना आरसा दाखवला होता या सरकारांनी आपापल्या राज्यांमध्ये मूल्यवर्धित कर कमी न करून जनतेला पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीचा पासून दिलासा दिला नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले होते.
त्यानंतर आज पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी महाराष्ट्राची आकडेवारी सादर करून महाराष्ट्राने पेट्रोल-डिझेलच्या वरच्या मूल्यवर्धित करातून तब्बल 72000 हजार कोटी रुपये कमावले, असे दाखवून दिले यावर्षी 33000 कोटींची भर पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पेट्रोल डिझेल वरचा मूल्यवर्धित कर कमी करायला काय हरकत आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे.
मात्र, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे जीएसटीच्या परताव्याची रक्कम शिल्लक असल्याची सबब पुढे करत पेट्रोल डिझेल दरवाढीतून जनतेला दिलासा देण्याचे नाकारले आहे. तसेच आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल डिझेल वरचा कर कमी होणार अशा बातम्या जरी आल्या असल्या तरी तसा कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे नाही, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करून महाराष्ट्राची आडमुठी भूमिका असल्याचे दाखवून दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App