विशेष प्रतिनिधी
पुणे – बुधवारी दुपारी चार वाजता बाजीराव रस्ता, चंद्रमोहन सोसायटीत अचानक विद्युतप्रवाह बंद झाल्याने पाच मजली असणारया इमारतीत दुसरया मजल्यावर लिफ्टमध्ये असणारी महिला लिफ्ट बंद पडल्याने तेथेच अडकली. सदर महिलेने तातडीने सोसायटीतील रहिवाशांना कळवून मदतीची मागणी केली असता स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात वर्दि दिली. वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालयातून वाहन रवाना झाले.Five storage building one lady get stuck in lift, fire brigade jawan free the women from the lift
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहणी करत अडकलेल्या महिलेला प्रथम धीर दिला. लिफ्ट पहिल्या व दुसरया मजल्याच्या मधोमध अडकली होती. महिलेला धीर देत संवाद साधत इतर जवानांनी लिफ्ट रुममधे जाऊन शाफ्ट फिरवून सदर लिफ्ट जागेवर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच खाली असणारया जवानांनी लगेचच सदर महिलेला आधार देत लिफ्टच्या बाहेर घेत सुखरुप सुटका केली.
सुटका होताच महिला व इतरांनी आनंद व्यक्त करत अग्निशमन दलाचे आभार मानले.या कामगिरीत दलाचे प्रभारी अधिकारी सचिन मांडवकर, वाहनचालक अतुल मोहिते तसेच जवान मनिष बोंबले, दिंगबर बांदिवडेकर, आझीम शेख, अक्षय दिक्षित, प्रतीक गिरमे यांनी सहभाग घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App