ब्राह्मण समाजाचा अवमान : राष्ट्रवादीची खरी झटका – झटकी की अमोल मिटकरींशी नुरा कुस्ती??

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यातील जाहीर सभेत कन्यादान विधी संदर्भातले मंत्र विकृत पद्धतीने म्हणून पुरोहित वर्गाचा आणि ब्राह्मण समाजाचा अवमान केला. त्यावरून ब्राह्मण समाजात संताप उसळल्यानंतर राष्ट्रवादीच्या लेखिका नेत्यांनी अमोल मिटकरी यांच्या विधाना पासून आपापले हात झटकून घेतले. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते होते.
A real blow to the NCP – a shock or a mere wrestling match with Amol Mitkari ??

मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातले नेते आणि धनंजय मुंडे यांचे समर्थक बाजीराव धर्माधिकारी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदू धर्मात “मम भार्यां समर्पयामि” असा मंत्र नसतो, तर मिटकरीला आमदारकीचे तंत्र सापडले असेल”, अशा शब्दांमध्ये बाजीराव धर्माधिकारी यांनी मिटकरी यांची खिल्ली उडवली आहे. स्वतः मिटकरी मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्याच वेळी आता संभाजी ब्रिगेडचे इतिहासकार श्रीमंत कोकाटे मिटकरी यांच्या समर्थनाला पुढे आले आहेत… आणि इथेच राष्ट्रवादी आणि अमोल मिटकरी यांच्यात नुरा कुस्ती सुरू झाल्याचा संशय वाढतो आहे…!!

मिटकरींवर सोशल मीडियातून वेगवेगळे प्रहार सुरू झाले असताना आणि राष्ट्रवादीने देखील त्यांच्या विधानावरून झटका झटकी केली असताना श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन केले त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

एकूणच या प्रकरणात ब्राह्मण समाजाचा संताप उसळल्यानंतर जयंत पाटलांनी सारवासारव करत दिलगिरी व्यक्त केली. धनंजय मुंडे यांनी देखील आमच्या मनाला जात-पात शिवत देखील नाही, असे सांगत हात झटकले. पण हेच ते दोन नेते होते जे अमोल मिटकरी यांच्या भाषणाच्या वेळी विकट हास्य करताना दिसत होते. मात्र ब्राह्मण समाजात संताप उसळला त्यांना बाकीच्या समाज यांचाही पाठिंबा मिळाला. सोशल मीडिया मध्ये अमोल मिटकरी ट्रोल झाले. त्यानंतर “जाग आल्यासारखे” राष्ट्रवादीचे नेते मिटकरी यांचे वक्तव्य झटकून बाजुला झाले. सुप्रिया सुळे यांच्या भोवती पंढरपुरात ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. त्यातून स्वतःची सुटका करून घेताना सुप्रिया सुळे यांनी, “फार मनाला लावून घेऊ नका”, असे सांगत काढता पाय घेतला, तर कोणी काही बोलले तर मला प्रश्न विचारत जाऊ नका नाही तर मी तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलणे बंद करेन, असा इशारा देत अजितदादा निघून गेले.

पण हे सगळे सुरु असताना आज अचानक संभाजी ब्रिगेडचे इतिहासकार श्रीमंत कोकाटे मिटकरी यांचे समर्थन करताना राज ठाकरेंवर घसरले. यामुळेच राष्ट्रवादी आता दुतोंडी भूमिका घेत अमोल मिटकरी यांच्या बरोबर नुरा कुस्ती खेळते आहे का…??, असा संशय तयार झाला आहे. एकीकडे अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यापासून आपले हात झटकून टाकायचे आणि दुसरीकडे मिटकरी यांना स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहायला सांगून श्रीमंत कोकाटे यांच्यासारखे समर्थ त्यांच्या पाठीशी उभे करायचे हा डाव राष्ट्रवादी खेळत असल्याचा संशय आहे. किंबहुना अनेकांना त्याची खात्री आहे. त्यामुळेच अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी यांच्यात नुरा नावाची नकली कुस्ती सुरू झाली आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे…!!

A real blow to the NCP – a shock or a mere wrestling match with Amol Mitkari ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात