पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 14 एप्रिलचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच भगवान महावीर जयंती आणि अन्य सणांचा मुहूर्त साधत ज्या प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन केले, त्या प्रधानमंत्री संग्रहालयाच्या कार्यक्रमावरून लिबरल मीडियाने दुगाण्या झाडल्या आहेत. “नेहरू का नाम हटा” असा धोशा लिबरल मीडियाने लावला आहे, तो पूर्णपणे खोटा आहे…!!Prime Minister’s Museum Nehru’s name removed
– तीन मूर्ती भवन जसे आहे तसेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाच्या उद्घाटनात कोठेही नेहरूंचे नाव हटवलेले नाही किंबहुना प्रधानमंत्री संग्रहालय ज्या परिसरात बांधले आहे, तेच मुळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान तीन मूर्ती भवन याच्या परिसरात बांधले आहे. एका अर्थाने तीन मूर्ती भवन परिसराचा हा विस्तार आहे. मूळ तीन मूर्ती भवन या वास्तूला ना कोठे धक्का लागला आहे, ना तिथले संग्रहालय कोठे हटविण्यात आले आहे…!!
परंतु लिबरल मीडियाने चलाखीने “नेहरू का नाम हटा” असा धोशा लावत जणू काही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त पंडित जवाहरलाल नेहरू यांचेच नाव हटविण्याच्या मागे लागले आहेत, असा कांगावा चालवला आहे.
– नेहरू-गांधी परिवार अनुपस्थित
प्रधानमंत्री संग्रहालय उद्घाटन कार्यक्रमाला देशाच्या सर्व पंतप्रधानांच्या कुटुंबीयांना आणि परिवाराला खास निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणावरून लालबहादूर शास्त्री गुलजारी लाल नंदा, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंहराव, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर आदी पंतप्रधानांचे कुटुंबीय आणि परिवार उपस्थित होते… याला अपवाद होता फक्त नेहरू-गांधी कुटुंबियांचा…!! नेहरू-गांधी कुटुंबियांना निमंत्रण नव्हते असे नाही. परंतु निमंत्रण असूनही ते आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
– प्रधानमंत्री संग्रहालय म्हणजे विस्तार
तीन मूर्ती भवन हे फक्त पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान असल्यामुळे त्यांना समर्पित असे स्मारक होते. ते नेहरूंचे समर्पित स्मारक कोठेही अन्यत्र हलविण्यात आलेले नाही. त्या परिसरातल्या मोकळ्या जागेवर प्रधानमंत्री संग्रहालय भव्य स्वरूपात बांधण्यात आले आहे, ही वस्तुस्थिती लिबरल मिडीया मुद्दामून झाकून टाकत आहे आणि त्यातूनच “नेहरू का नाम हटा” असा धोशा त्याने लावला आहे.
– लिबरल मिडियाची दांभिकता
पंडित जवाहरलाल नेहरू 1947 ते 1962 या कालावधीत पंतप्रधान होते. त्यांचे योगदानही प्रधानमंत्री संग्रहालयात व्यवस्थित रीतीने मांडण्यात आले आहे. त्यांच्याबरोबरच बाकीच्या सर्व पंतप्रधानांचे त्यांची कारकीर्द नेमकी किती दिवसांची अथवा वर्षांची आहे हे न पाहता त्यांचे योगदान व्यवस्थित प्रदर्शित करण्यात आले आहे. हे एक प्रकारे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अन्य पंतप्रधानांबरोबर योगदान मांडणी हेच नेहरू-गांधी परिवाराला खटकलेले दिसते. आणि नेहरू-गांधी परिवाराला जे खटकते, जे नको असते, तेच भारतातल्या लिबरल मीडियाला खटकते आणि त्याला नको असते, हेच यातून दिसून येत आहे…!!
– नेहरू-गांधी परिवाराला काय टोचते??
पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचे योगदान नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण तेच फक्त “एकमेवाद्वितीय” पंतप्रधान होते, बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ होते, त्यांच्यापुढे बाकीच्या पंतप्रधानांचे योगदान काहीच नाही असा जो युक्तिवाद छुपेपणाने लिबरल मीडिया मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याला प्रधानमंत्री संग्रहालयातून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे आणि नेमके हेच प्रत्युत्तर नेहरू-गांधी परिवाराला आणि लिबरल मीडियाला टोचत आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App