Nawab Malik ED : नवाब मलिकांना ईडीचा दणका; गोवावाला कंपाऊंड, उस्मानाबादेतील 148 एकर जमीन, अन्य प्रॉपर्टी जप्त!!

वृत्तसंस्था

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर तिच्याशी मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रॉपर्टी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली असून यामध्ये कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडची जमीन, उस्मानाबादेतील 148 एकर जमीन, त्यांचे राहते दोन फ्लॅट्स आणि अन्य ठिकाणचे तीन फ्लॅट यांचा समावेश आहे.Nawab Malik hit by ED; Goa compound, 148 acres of land in Osmanabad, other property confiscated

सध्या नवाब मलिक हे ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिक यांच्यावर हसीना पारकर हिच्याबरोबर गोवावाला कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी करण्याचा व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे.



या आरोपांची सध्या ईडी चौकशी करत आहे. नवाब मलिक यांच्या विविध प्रॉपर्टीजची यादी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केली. त्यानंतर कोर्टाच्या कायदेशीर आदेशानुसारच नवाब मलिक यांनी खरेदी केलेली गोवावाला कंपाऊंडची जमीन, उस्मानाबाद मधील 148 एकर जमीन तसेच कुर्ला परिसरातील त्यांचे राहते दोन प्लेट्स आणि अन्य तीन फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत.

Nawab Malik hit by ED; Goa compound, 148 acres of land in Osmanabad, other property confiscated

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात