प्रतिनिधी
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा गुढीपाडव्याचा मेळावा राजकीय दृष्ट्या प्रचंड यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरे यांची उत्तर सभा उद्या ठाण्यात रंगणार आहे. पण ही सभा जास्तीत जास्त रंगावी यासाठी बाळासाहेबांच्या “वाऱ्याच्या आवाजातून” ठाण्यात मनसेची “हवा” तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.Balasaheb’s attempt to “air” the MNS station “through the sound of the wind
राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवण्याच्या वादग्रस्त वक्तव्यातून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वादळ आणले. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकप्रतिनिधी निवडून येतात, त्यांच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करायची?, असे शरद पवारांनी त्यांना हिणवले. पण हाताच्या बोटाच्या पलिकडे मोजण्या एवढ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संपलेल्या पक्षावर मी प्रतिक्रिया देत नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. मनसेने पेंग्विनचे चित्र टाकून त्यांची खिल्ली उडवली.
आता उद्याच राज ठाकरे यांची सभा ठाण्यात रंगत असताना मनसेची ठाण्यात मोठी हवा निर्माण करण्यासाठी बाळासाहेबांच्या आवाजात दुसरा टीजर जारी करण्यात आला आहे. “वारा मोठा सुटला आहे. तो आपला वारा आहे”, असे बाळासाहेब म्हटल्याचे यात ऐकू येत आहे. त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांचे प्रचंड सभेत असे चित्र वापरण्यात आले आहे.
#उत्तरसभा pic.twitter.com/7HCIZPujpS — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 11, 2022
#उत्तरसभा pic.twitter.com/7HCIZPujpS
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 11, 2022
मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचा पहिला आवाज राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात टाकला. आता ठाण्याच्या उत्तर सभेत ते कुणावर आवाज टाकणार?, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App