शिक्रापुरात स्विफ्ट व लक्झरीचा भिषण अपघात, एकाचा मृत्यू लक्झरी पलटी होऊन वाहनांना धडकत थेट हॉटेल मध्ये शिरली

शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर बजरंग वाडी येथे स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूस येऊन लक्झरीला धडकून झालेल्या अपघातात लक्झरी पलटी होऊन थेट एका हॉटेल मध्ये शिरली आणि कार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे-शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर बजरंग वाडी येथे स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूस येऊन लक्झरी ला धडकून झालेल्या अपघातात लक्झरी पलटी होऊन थेट एका हॉटेल मध्ये घुसली असून यावेळी झालेल्या अपघातात स्विफ्टकार चा चक्काचूर होत तब्बल पाच वाहनांसह हॉटेलचे नुकसान होऊन कार चालक विशाल बबन सासवडे या युवकाचा मृत्यू होऊन पंचवीस जण जखमी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेश येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  Wrong side Swift car dashed laxaury bus, car driver dead near shikrapur

शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून एम एच १४ एच यु २२६५ हि लक्झरी बस पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने येत असताना अहमदनगर बाजूने आलेली एम एच १२ पि एन ६७२८ हि स्विफ्ट कार अचानकपणे दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूला येत लक्झरी बसवर आदळली यावेळी वेगाने आलेली लक्झरी बस अचानकपणे शेजारील रॉयल पॅलेस हॉटेल समोर असलेल्या विजेच्या खांब व हॉटेलच्या फलकाला धडकून पलटी होत थेट हॉटेल मध्ये घुसली यावेळी हॉटेलच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या एन एच १२ एल व्ही ५११५, एन एच ०१ डी के १८०६, एन एच १२ सि के ८५६८ या तीन वाहनांना देखील लक्झरी धडकल्याने या वाहनांचे देखील नुकसान झाले आहे,

दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, विक्रम साळुंके, रणजीत पठारे, नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक कल्पेश राखोंडे, राकेश मळेकर, शिवाजी तळोले, भरत कोळी, बापू हडागळे, विकास पाटील, संतोष मार कड, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, जयदीप देवकर, अमोल नलगे, विकास मोरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करत अपघातातील वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली.

Wrong side Swift car dashed laxaury bus, car driver dead near shikrapur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात