प्रतिनिधी
मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर सर्व मनसैनिकांना पुन्हा एकदा उभारी आल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरेंनी केलेले ‘मशीदीवरील भोंगे हटवा, अन्यथा हनुमान चालीसा लावू’, हे विधान सध्या वादग्रस्त ठरत आहे. यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी भोंगे लावायला सुरुवातही केली. या पार्श्वभूमीवर मनसेनेने राम नवमीला आता शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवनाबाहेर भोंगे लावले. पोलिसांनी भोंगे काढा लगेच कारवाई केली. MNS has announced to put a loudspeaker outside Shiv Sena Party HQ
भोंग्यांवर हनुमान चालीसा लावून रामनवमीच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
Maharashtra | MNS has announced to put a loudspeaker outside Shiv Sena Party HQ 'Shiv Sena Bhawan' in Mumbai and play Hanuman Chalisa on it today on the occasion of #RamNavami pic.twitter.com/CkQXME2aeX — ANI (@ANI) April 10, 2022
Maharashtra | MNS has announced to put a loudspeaker outside Shiv Sena Party HQ 'Shiv Sena Bhawan' in Mumbai and play Hanuman Chalisa on it today on the occasion of #RamNavami pic.twitter.com/CkQXME2aeX
— ANI (@ANI) April 10, 2022
हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे. पण काही वेळातच पोलिसांनी मनसेकडून लावण्यात आलेला भोंगा जप्त करून यशवंत किल्लेदारांसह मनसैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. यासह मनसेचे हे भोंगे जप्त केले असून मनसैनिकांनी राबवलेल्या या उपक्रमाला प्रशासनाने ठिकठिकाणी हरकत घेतल्याचेही दिसून आले आहे. एका टॅक्सीवर हा भोंगा लावून हनुमान चालीसा लावण्यात आली. ज्या मंदिर, मंडळाला मनसेचा हा रथ हवा असेल तिथे तिथे तो फिरवला जाणार असल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जिथे मशिदींवर भोंगे लावून अजान सुरू असेल तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच घाटकोपर येथे मनसेच्या कार्यालयावर भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले होते. पण पोलिसांनी काही वेळातच मनसेच्या कार्यालयावरील लावण्यात आलेले भोंगे काढून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर आज रामनवमीच्या निमित्ताने मनसेकडून चक्क शिवसेना भवनासमोरच हनुमान चालीसा लावली गेली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App