लग्नानंतर सहा वर्षानंतरही मुल हाेत नसल्याने पतीसह सासरचे लाेक पतीच्या दुसऱ्या लग्नाकरिता मुलगी पाहत असल्याने तसेच पती मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे
विशेष प्रतिनिधी
पुणे : लग्नानंतर सहा वर्षानंतरही मुल हाेत नसल्याने पतीसह सासरचे लाेक पतीच्या दुसऱ्या लग्नाकरिता मुलगी पाहत असल्याने तसेच पती मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसावरी सचिन धुमाळ ( वय-२८,रा.ढमाळवाडी, फुरसुंगी,पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. After marriage six years wife incapable to children husband and his family members tolarte the women
याप्रकरणी तिचा पती सचिन वसंत धुमाळ (३३), साससरे वसंत पांडुरंग धुमाळ (६५), सासु वंदना वसंत धुमाळ (६०), दीर स्वप्नील वसंत धुमाळ (२८), जाऊ अंजली स्वप्नील धुमाळ (२५) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पाेलीसांनी दाखल केला आहे. याप्रकरणी आसावरी हिचा भाऊ राेहन गाेविंद पाेळ (वय-२५,रा.जेजुरी,पुणे) याने पाेलीसांकडे आराेपीं विराेधात तक्रार दाखल केली आहे.
सचिन व आसावरी यांचा विवाह सन २०१४ मध्ये थाटामाटात पार पडला हाेता, त्यानंतर आसावरी पुण्यातील फुरसुंगी भागात सासरी पतीसह रहाण्यास आली हाेती. लग्न झाल्यानंतर तिला मुलबाळ हाेत नसल्याने सासरचे लाेक तिचा मानसिक, शाररिक छळ करत हाेते. तिचे लग्न झालेले असताना सुध्दा तिला मुलबाळ हाेत नसल्याचे कारणावरुन तिचा पती सचिन धुमाळ याला दुसरी मुलगी पाहण्यासाठी तिला जबरदस्तीने सासरचे लाेक घेऊन जात हाेते. तसेच सचिन ही तिच्याशी काैटुंबिक वादातून शिवीगाळ करुन मारहाण करत हाेता. या छळाला कंटाळून आसावरी हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत हडपसर पाेलीस पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App