प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीत सर्वाधिक लाभार्थी ठरली राष्ट्रवादी काँग्रेस. निधी वाटपात राष्ट्रवादीने केलीये शिवसेनेवर मात, पण इंडियन एक्सप्रेसच्या रेटिंग स्पर्धेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर आघाडी घेतली.Thackeray – Pawar: NCP’s distribution of funds to Shiv Sena
महाविकास आघाडी सरकारची स्थापना करून राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनवले, हा “चमत्कार” अध्यक्ष शरद पवार यांनी करून दाखवला. आमदार निधी वाटपात राष्ट्रवादीने वर्चस्व राखले पण सरकारला दोन वर्षे पूर्ण होताच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार मागे टाकले आहे. भारतातील १०० शक्तिशाली नेत्यांमध्ये ठाकरे यांनी १६ वा क्रमांक पटकावला आहे, तर शरद पवार यांनी १७ वे स्थान मिळवले आहे.
पहिल्या क्रमांकावर नरेंद्र मोदीच
इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या रेटिंग मध्ये भारतातील १०० शक्तिशाली व्यक्तींची यादी बनवली आहे, या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांनी अव्वलस्थान पटकावले आहे. तर या यादीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दुसऱ्या स्थानावर आहेत.
नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी सहावे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत 16 वे आणि शरद पवार यांनी 17 वे स्थान पटकावले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना 83 वे स्थान मिळाले आहे.
राहुल 51 अखिलेश 56
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तिसऱ्या स्थानावार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांना चौथे स्थान मिळाले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी हे पाचव्या स्थानावर आहेत. उद्योगपती गौतम अदानी हे सातव्या स्थानी आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आठव्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवव्या आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन दहाव्या स्थानावर आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या अकराव्या स्थानी आहेत. तर सरन्यायाधीश रमण्णा हे १२ व्या स्थानी आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तेरावे स्थान मिळाले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 27 वे, राहुल गांधी यांना 51 वे आणि अखिलेश यादव यांना ५६ वे स्थान मिळाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App