प्रतिनिधी
नवी दिल्ली/ मुंबई : एरवी काँग्रेसवर आंदोलनाची चढाई करणारे दोन पक्ष आज एकमेकांविरोधात वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन करताना दिसले. भाजप आणि आम आदमी पार्टी हे दोन पक्ष या दोन पक्षांनी एकमेकांविरुद्ध आंदोलन केले. BJP-AAP movement face to face
– गेटवर फासला भगवा रंग
दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपचे खासदार तेजस्वी सूर्य यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. काश्मिरी पंडितांवर अत्याचार झालाच नसल्याचा अजब दावा त्यांनी केला होता. त्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. केजरीवाल यांच्या घराच्या गेटवर भगवा रंग फासला आणि आत मध्ये घुसून भिंतीवर भगव्या रंगात बुडवलेले हाताचे ठसे उमटवले. खासदार तेजस्वी सुर्या यांच्यासह कार्यकर्त्यांना नंतर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र भाजपच्या गुंडांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. बॅरिकेट तोडली. सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, असा दावा आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांनी केला आहे.
माननीय मुख्यमंत्री @arvindkejriwal जी के आवास पर भाजपा के गुंडों द्वारा करा गया हमला बेहद निंदनीय है. पुलिस की मौजूदगी में इन गुंडों ने बैरिकेड तोड़े, सीसीटीवी कैमरा तोड़े. पंजाब की हार की बौखलाहट में भाजपा वाले इतनी घटिया राजनीति पर उतर गए. pic.twitter.com/ewzhqQgYyU — Raghav Chadha (@raghav_chadha) March 30, 2022
माननीय मुख्यमंत्री @arvindkejriwal जी के आवास पर भाजपा के गुंडों द्वारा करा गया हमला बेहद निंदनीय है. पुलिस की मौजूदगी में इन गुंडों ने बैरिकेड तोड़े, सीसीटीवी कैमरा तोड़े. पंजाब की हार की बौखलाहट में भाजपा वाले इतनी घटिया राजनीति पर उतर गए. pic.twitter.com/ewzhqQgYyU
— Raghav Chadha (@raghav_chadha) March 30, 2022
– दरेकरांविरुद्ध आंदोलन
तिकडे दिल्लीत केजरीवाल विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी संतप्त आंदोलन केले असताना तिकडे मुंबईत मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरेकरांनी मुंबै बॅंकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामध्ये शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते.
– मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा
आम आदमी पार्टीने मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. या पार्श्वभूमीवर या पक्षाने मुंबईत पहिल्या आंदोलनकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांना टार्गेटवर घेतले आहे.
एरवी भाजपा आणि आम आदमी पार्टी हे काँग्रेस विरोधात जोरदार तोफा डागत असतात पण आता त्यांनी आपापली टार्गेट बदलली असून ते एकमेकांवर तोफा डागताना दिसले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App