विशेष प्रतिनिधी
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयुष्यभर काड्या करण्याशिवाय दुसरे काही काम केले नाही. त्यामुळे पवारांचे आडनाव बदलून ते आगलावे करा, अशा शब्दांत आमदार सदाभाऊ खोत यांनी शरसंधान साधले आहे. MLA Sadabhau Khot targets Sharad Pawar over his politics splits
शेतकरी मेळाव्याला हजर राहण्यापूर्वी ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सदाभाऊ म्हणाले की, शरद पवारांचे आडनाव आता आगलावे करावे. शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. पण त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम पवारांनी आयुष्यभर केले आहे. पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले आहे. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सदाभाऊ खोतांच्या या टीकेला राष्ट्रवादीतून अद्याप कोणी प्रत्युत्तर दिलेले नाही. याआधी देखील सदाभाऊ खोतांनी पवारांवर शरसंधान साधले होते. पवार म्हणतात, पुन्हा येऊ म्हणणाऱ्यांना आम्ही पुन्हा येऊ दिले नाही. जे यायचे ते येतीलच. पण तुमच्या नशिबी पंतप्रधानपद नाही, असे टीकास्त्र सदाभाऊ खोत यांनी आधी सोडले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App