Specially-Abled Painter : दोन्हीकडे ‘ नरेंद्र ‘!२५ वर्षीय आयुष कुंडलचे फॅन झाले पंतप्रधान मोदी ; माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण-करणार ट्विटरवर फॉलो…

सेरेब्रल पाल्सीमुळे आयुष कुंडलच्या शरीराचा 80 टक्के भाग काम करत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील आयुष कुंडलची भेट घेतली .  आयुष्य कुंडल  अपंग असूनही  उत्तम चित्रकार आहे. Specially-Abled Painter: ‘Narendra’ on both sides! Prime Minister Modi became a fan of 25-year-old Ayush Kundal; Unforgettable moment for me- will follow on Twitter …

पंतप्रधानही त्याचे चित्र काढण्याचे कौशल्य बघून भावूक झाले.


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिवासी आयुष कुंडलची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, आयुषची भेट हा एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. आयुष हा दिव्यांग असून पायाने पेंटिंग करतो. त्याने पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती .त्याची ही इच्छा मोदींनी पूर्ण देखील केली तसेच त्याच्या कौशल्याचे कौतुक करताना मोदी म्हणाले मी तुला ट्विटरवर फॉलो करणार आहे.Specially-Abled Painter: ‘Narendra’ on both sides! Prime Minister Modi became a fan of 25-year-old Ayush Kundal; Unforgettable moment for me- will follow on Twitter …

मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील बरवाह येथील आयुष हा रहिवासी आहे. तो जन्मतःच अपंग असून तो पायाने उत्कृष्ट चित्र काढतो. त्याचे चित्र पाहण्यासाठी अनेक ठिकाणांहून लोक येत असतात. मात्र आयुषने पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची इच्छा समजताच पंतप्रधान मोदींनी आयुषची आज भेट घेतली आहे.

पंतप्रधान मोदींनी आयुषची भेट घेतल्यानंतर त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. आयुषची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले, ‘ आयुषची भेट माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला. आयुषने ज्याप्रकारे चित्रकलेत प्रभुत्व मिळवले आणि त्याच्या बोटांनी ज्या चित्राला आकार दिला, ते सर्वांना प्रेरणा देणारे आहे. प्रेरणा मिळत राहण्यासाठी मी त्याला ट्विटरवर फॉलो करत आहे.

जन्मजात दोषांमुळे आयुष आपल्या पायावर उभा राहू शकत नाही. त्याच्या हातांचीही हालचाल होत नाही. त्यांना बोलताही येत नाही. अनेक शारीरिक कमतरता असतानाही तो पायाने उत्कृष्ट चित्रे काढतो. गेल्या वर्षी आयुषने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे चित्र काढले होते. आयुषने कुटुंबासह मुंबईला जाऊन अमिताभ यांना त्यांच्या बंगल्यावर हे चित्र सादर केले होते. त्यांची कला पाहून अमिताभ बच्चन भारावून गेले. अमिताभ यांनी आयुषचे पेंटिंग ट्विटरवर शेअर करून त्याच्या कलेचे कौतुक केले होते.

Specially-Abled Painter: ‘Narendra’ on both sides! Prime Minister Modi became a fan of 25-year-old Ayush Kundal; Unforgettable moment for me- will follow on Twitter …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात