मौजमजेसाठी वाहने चोरणारी तीन अल्पवयीन मुले ताब्यात

मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.


प्रतिनिधी

पुणे –मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरलेली 1 लाख 60 हजाराची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.Vehical theft juvenil two accused in custody of police

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत वाहणचोरीच्या अनुषंगाने गस्त तसेच नाकाबंदी करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी आदेश दिले होते.त्यानूसार सोमवारी रात्री केसनंद फाटा चौक वाघोली येथे पोलीस नाईक कर्णवर यांना खबर मिळाली कि, एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकल वर तीन मुले केसनंद कडुन वाघोलीकडे निघालेले आहेत,



त्यावरुन केसनंद रोडने येणारे वाहणावर पाळत ठेवण्यात आली मोटारसायकलवरुन तीन मुले वाघोली- केसनंद चौकाकडे येत असताना त्यांना पोलीसांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र त्यावरील चालक वाहण वळवुन घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन पकडले.

त्यांना पोलीस उप निरीक्षक सुरज गोरे, पोलीस अंमलदार शेडगे व कोकरे यांनी पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे चौकशी केली असता, मोटरसायकल चोरीची असलेचे निष्पन्न झाले.तीनही मुलांना अधिक विश्वासात घेऊन कसुन चौकशी करता त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीमधुन एक व्हेस्पा, होंडा ऍक्‍टीवा, होंडा डिओ अशा तीन मोपेड मोटारसायकल चोरी केलेचे कबुल केले.

त्यांच्याकडून तीनही मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार सो, पोलीस निरीक्षक तटकरे, पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, निखील पवार, पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे यांच्या पथकाने केली

Vehical theft juvenil two accused in custody of police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात