वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट मध्ये प्रचंड हिंसाचार उसळला असून तृणमूल कॉंग्रेसचा नेता भादू शेख यांच्या हत्येनंतर बदल्याची आग भडकली आणि तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी 10 लोकांना त्यांच्या घरात कोंडून जिवंत जाळले. सोमवारी रात्री ही घटना घडली.In Bengal, revenge fire erupted after the assassination of Trinamool leader Bhadu Sheikh
या घटनेनंतर पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचाराची देशभर चर्चा सुरू झाली असून सर्वत्र जोरदार निषेध व्यक्त होत आहे. स्थानिक निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यातून रामपुरहाट मधला तृणमूल काँग्रेसचा नेता भादू शेष यांची हत्या झाली. त्यानंतर सोमवारी रात्री भादू शेतीच्या समर्थकांनी 10 लोकांना त्यांच्या घरात कोंडले आणि बाहेरून आग लावून दिली. त्याच वेळी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून भादू शेख समर्थक या घरांत भोवती पहारा देत होते. ही घरे पूर्ण भस्मसात झाल्यानंतरच भादू शेखचे समर्थक तेथून हालले.
घटना कल रात की है,10-12 घर थे जो जल चुके हैं, कुल 10 लोगों की मृत्यु हुई है जिनकी बॉडी रिकवर की गई है। एक ही घर से 7 लोगों के शव निकाले गए हैं: रामपुरहाट में तृणमूल नेता की हत्या के बाद कथित रूप से भीड़ द्वारा घरों में आग लगाने से कई लोगों की मृत्यु पर दमकल अधिकारी, बीरभूम pic.twitter.com/66ptPD3NXK — ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2022
घटना कल रात की है,10-12 घर थे जो जल चुके हैं, कुल 10 लोगों की मृत्यु हुई है जिनकी बॉडी रिकवर की गई है। एक ही घर से 7 लोगों के शव निकाले गए हैं: रामपुरहाट में तृणमूल नेता की हत्या के बाद कथित रूप से भीड़ द्वारा घरों में आग लगाने से कई लोगों की मृत्यु पर दमकल अधिकारी, बीरभूम pic.twitter.com/66ptPD3NXK
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2022
– पोलिसांनी 10 मृतदेह बाहेर काढले
आज सकाळी पोलिस रामपुरहाट मध्ये पोहोचले तेव्हा त्यांना भस्मसात झालेली घरे दिसली तसेच पोलिसांनी संपूर्ण जळलेल्या अवस्थेतले 10 मृतदेह बाहेर काढले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचार यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता कोलकात्त्याचे महापौर आणि राज्याचे मंत्री फरहात हकीम यांना रामपूर हटला पाठवले असून पोलिसांना देखील ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
– तृणमूलचा इन्कार
मात्र, तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या हिंसाचाराचा इन्कार केला असून स्थानिक नागरिकांच्या घरांमधल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा दावा केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App