प्रतिनिधी
मुंबई : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्याने आता राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना टोले हाणले आहेत. NCP MIM Alliance devendra fadnavis
आता शिवसेनेने “जनाब” बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेच आहे, त्यामुळे त्याचा आता काय परिणाम होतो, असा टोलाही यावेळी फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे. राष्ट्रवादीने जरुर एमआयएमसोबत जावे. कारण ते सगळे “एकच” आहेत. देशात भाजपला हरवण्यासाठी सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही एकत्र आले तरी देशातील आणि राज्यातील जनता ही मोदींच्या पाठीशी आहे. फक्त आता या सगळ्या युतीच्या समीकरणात शिवसेना काय करणार हे पहाणे आता गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
– शिवसेनेने “जनाब” स्वीकारलेच आहे
शिवसेना आता सत्तेसाठी काय करते, तेच आम्हाला पहायचे आहे. तसंही शिवसेनेने आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी “जनाब” बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहे. त्यांच्याकडून अजानच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे, त्यामुळे त्याचा आता काय परिणाम होतो ते बघू या, असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला.
– हरल्यानंतर त्यांना “हे” सगळे दिसते
एमआयएम ही भाजपची “बी टीम” असल्याचा आरोप अनेकदा करण्यात येतो.हरल्यानंतर त्यांना ईव्हीएम मशिन, बी, सी, झेड टीम दिसत असतात. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याचे गरज नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
– एमआयएमची ऑफर राष्ट्रवादीला
एमआयएमचे खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीत देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या, अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App