एअरफाेर्स मध्ये नाेकरी लावण्याचे अमिषाने फसवणुक

एअरफाेर्स मध्ये नाेकरी लावण्याचे अमिष दाखवून अकादमी चालकाने दहा लाख ९० हजार रुपयांना फसविल्याची बाब उघडकीस आली आहे. Air force job offer and cheated youth for 11lakhs rupees


विशेष प्रतिनिधी

पुणे : सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्यास एअरफाेर्स मध्ये नाेकरी लावण्याचे अमिष दाखवून अकादमी चालकाने दहा लाख ९० हजार रुपयांना फसविल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी लाेणीकंद पाेलीस ठाण्यात वाडेगाव, हवेली,पुणे येथील अकादमी ट्रस्टचे संचालक व इतर दाेन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत पुण्यातील एरंडवणा येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने पाेलीसांकडे आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. सदर तरुणाचे पदवी पर्यंत शिक्षण झाले असून ताे अकादमी ट्रस्ट मध्ये मे २०१९ पासून भरतीपूर्व शिक्षण घेत हाेता. त्यावेळेस त्याला अकादमी चालक यांनी जनरल रिझर्व इंजिनिअरिंग फाेर्स यामध्ये तसेच एअर फाेर्स मध्ये नाेकरी लावताे असे अमिष दाखवले. त्याचा विश्वास संपादन करुन वेळाेवेळी त्याच्याकडून एकूण दहा लाख ९० हजार रुपये रक्कम घेऊन त्यास नाेकरीस न लावता त्याची सदर रकमेची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत पाेलीस उपनिरीक्षक किरण वराळ पुढील तपास करत आहे.

Air force job offer and cheated youth for 11lakhs rupees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात